HW News Marathi
महाराष्ट्र

सोलापूरच्या पालकमंत्री पदी जितेंद्र आव्हाड यांची तात्काळ नियुक्ती

मुंबई | राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सोलापूरच्या पालकमंत्री तात्काळ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिपील वळसे पाटील यांना सोलापूरच्या पालकमंत्री निवड झाली होती. राज्या सरकारने याबद्दल एक पत्र जारी केले असून यात ८ जानेवारी शासनाच्या निर्णयात अंशतः बदल करुन आव्हाड यांची सोलापूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली, अशी माहिती दिली आहे. मात्र, देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा २०० पार गेला आहे. यामुळे सध्या स्थिती नागरिकांचे हाल होत आहेत.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पालमंत्री त्यांचा नागरिकांना कोरोना मात करण्यासाठी घरातून बाहेर पडू नये, म्हणून जीवनावश्यक वस्तू पुरविल्याबद्दल माहिती दिली जात आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांमध्ये समन्य दिसत नसल्याचे उघडपणे दिसून आले. दरम्यान, सोलापूरचे पालकमत्री दिलीप वळसे-पाटील गायब असल्याचे निदर्शनास आले. मात्र, लापूर जिल्ह्यासाठी तत्काळ नवा पालकमंत्री नियुक्त करावा, अशी मागणी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली होती. यापार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांची सोलापूरच्य पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी भवन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

News Desk

“मोदींच्या पक्षाला आज एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे!” – सामना

News Desk

BharatBandh | शिवसेना बंदात सहभागी झाली नाही, तरी देखील बंद यशस्वी | अशोक चव्हाण

swarit