HW News Marathi
महाराष्ट्र

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका!

ठाणे। राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणात ठाणे पोलिसांनी अटक केली असून नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तांकडून या माहितीस दुजोरा देण्यात आला आहे. दरम्यान, ठाकरे सरकारमधील मंत्र्यावर झालेल्या या कारवाईन मोठी खळबळ उडाली आहे.

१० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर

अनंत करमुसे यांना जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात मंत्री जितेंद्र आव्हाड यांना आज अटक करण्यात आली. त्यांना पोलिसांनी कोर्टात हजर करण्यात आले असता १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी

अनंत करमुसे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं. त्यांना कशाप्रकारे मारहाण करण्यात आली ये सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत होती. मात्र, त्यांचच सरकार असल्यामुळे त्यांच्याविरोधात काहीही कारवाई झाली नसेल. मात्र आता कोर्टाच्या काही अडचणी अल्या असतील. तसेच इतर संभाव्य अडचणी आल्या असतील त्यामुळे ऑनरेकॉर्ड अटक दाखवली असेल. पण सरकार यांचच असल्याेमुळे जामिनाची व्यवस्था करुन ठेवली असेल, असा दावा प्रविण दरेकर यांनी केली.

अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर तरुणाने केला होता

जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर तरुणाने केला केला होता. फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने या तरुणाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला होता. यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही दावा त्या तरुणाने केला होता. नंतर या प्रकरणाचे मोठे राजकीय पडसाद उमटले होते. याच प्रकरणात आव्हाड यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आलेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊन वाढवल्यासंदर्भात अधिसूचना जाहीर

News Desk

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी, कोरोना बाधितांची रुग्ण संख्या शंभरीच्या खाली!

News Desk

‘तुमचा मेंदू कुठे आहे, तेवढं तपासा’; जितेंद्र आव्हाडांनी महेश शिंदेंना सुनावलं

News Desk