HW News Marathi
महाराष्ट्र

मी पॅकेज देणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे!

कोल्हापूर। काही दिवसाांपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा मोठा तडाखा बसला. आणि यामध्ये प्रचंड नागरिकांनी आपला जीव गमावला, तर काहींना बेघर व्हावं लागले, यानंतर स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणवार जीवित आणि वित्तहानी देखील झाली. कोल्हापुरात २०१९नंतर पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे हजारो नागरिकांचे संसार पाण्यात वाहून गेले. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा दिला आहे. तर यावेळी उद्धव ठाकरे असं देखिल म्हणाले की मी पॅकेज देणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे.

कायमस्वरूपी इलाज महत्त्वाचा

“काही कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील. ते नाही घेतले, तर हे संकट आपली पाठ सोडणार नाही. जे काही करता येणं शक्य आहे, ते आपण करू शकतो. आत्ताच ते शक्य आहे. नदी पात्रात झालेली अतिक्रमणांबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, की यापुढे आता बांधकामं करता येणार नाही. नाहीतर ब्लू लाईन, रेड लाईन या रेषा मारूच नका. मग जे व्हायचं, ते होऊ द्या. पण असं आपल्याला करता येणार नाही. त्यावर कायमस्वरूपी इलाज करणं हा महत्त्वाचा भाग आहे”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

अशा गावांचंही पुनर्वसन करावं

आता यावर कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा. तोडगा काढायचा असेल, तर येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. त्याचा आराखडा बनवून काम सुरू करावं लागेल. कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते यांचाही अभ्यास करावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्याने पूरबाधित भागातील नागरिकांचं पुनर्वसन करणं ही बाब आहे. दरड कोसळण्याची शक्यता आहे, अशा गावांचंही पुनर्वसन करावं लागणार आहे”, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे हीच आमची प्राथमिकता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

News Desk

संभाव्य पुरस्थितीती लक्षात घेता सांगली महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सक्रिय

News Desk

भविष्यात आघाडीसंदर्भात प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करू – नाना पटोले

News Desk