HW News Marathi
महाराष्ट्र

UPA चे अध्यक्षपद भूषविण्यात मला रस नाही! – शरद पवार

कोल्हापूर | “यूपीएचे अध्यक्षपद भूषविण्यात मला रस नाही. मला त्यात पडयचे नाही, ती जबाबदारी मला घेईची नाही,” अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. शरद पवार यांनी पहिल्यात यूपीएच्या अध्यक्ष पदावरून पहिल्यांदा प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. शरद पवारांनी आज (३ एप्रिल) कोल्हापूरात पत्रकार परिषद घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि  खुद शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष भूषवण्यात रस नसल्याचे म्हटल्यावर सर्व चर्चांनापूर्णविराम लागला आहे. 

“मी यूपीए अध्यक्ष बनावे, असा ठराव एका तरुणाने केला. परंतु, मला यत्किंचितही यात रस नाही. आणि मला त्यात पडायचे देखील नाही. मी त्यांची जबाबदारी घेणार नाही. एकत्र येऊन जर कोणी पर्याय देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना मी सहकार्य आणि मदत या सगळ्या दृष्टीने माझी तयारी आहे. मी विचार करु शकतो, हे बघत असताना विरोधी पक्षांनी एकत्र यावे,” असे शरद पवार म्हणाले. 

शरद पवारांची राज ठाकरेवर टीका

३ ते ४ महिने भूमिगत होतात, आणि एखादे व्याख्यान देऊन पुन्हा पुढील ३ ते ४ महिने काय करतात, हे मला माहित नाही, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यापासून राज्यातील जातीपातीचे राजकारण सुरू झाले, असा आरोप राज ठाकरेंनी केला होता. यावर शरद पवार यांनी आज (३ एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मनसेच्या गुढीपाडवा निमित्ताने पार पडलेल्या मेळाव्यात महाविकासआघाडी आणि शिवसेनेवर राज ठाकरेंनी तोफ डागली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २७ फेब्रुवारी रोजी मतदान

Aprna

“…झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच”, राष्ट्रवादीची मिश्किल टीका

Aprna

आमच्या मिरवणुकांवर दगडफेक होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही!, राज ठाकरेंचा इशारा

Aprna