HW News Marathi
महाराष्ट्र

मी नार्को टेस्ट करायला तयार आहे मात्र तुमच्या सरकारचे नेते टेस्ट करतील ?

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर राजकीय वातावरणात या प्रकरणावरून ठिणगी उडण्यास सुरुवात झाली आहे. अभिनेत्री कंगणा राणावत हिने या प्रकरणात उडी घेत मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला आणि टीकेची झोड उठायला तयार झाली. अशातच, कॉंग्रसचे नेते सचिन सावंत यांनी भाजप नेते राम कदम यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यावर आता राम कदम यांनी उत्तर दिले आहे.

 

सचिन सावंत यांच्या ट्वीटला उत्तर देत राम कदम यांनी ट्वीट केले आहे. राम कदम ट्वीटमध्ये म्हणाले की, ‘छत्रपती शिवरायांना मानणारा मी मावळा आहे उद्या नव्हे ,या क्षणाला सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे मी व माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करावी. मात्र या प्रकरणात अडकलेले तुमच्या सरकारचे बडे नेते, मंत्री नार्को टेस्ट करायाला तयार आहेत का ? ते तपासून पहा,’ असा सवाल त्यांनी विचारला आहे.

“सुशांतसिंगराजपूत प्रकरणात बडे नेते अभिनेते आणि ड्रग माफिया याना महाराष्ट्र सरकारचा वाचवण्याचा प्रयत्न संपूर्ण देश दुनियाने पाहिला . या कालखंडात आक्रमकपणे सुशांतला न्याय मिळावा म्हणून आम्हा सर्वांची प्रामाणिक धडपड संपूर्ण देशाने पाहिलीं हेच सरकारच्या जीव्हारी लागेल”, असा टोलाही राम कदमांनी सचिन सावंत यांना लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वातंत्रवीर सावरकरांसाठी एकदिवसीय उपोषण

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इंकमिंग सूरू? सुबोध मोहिते राष्ट्रवादीच्या वाटेवर?

News Desk

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली आमदार जयकुमार गोरे यांची भेट; प्रकृतीची केली विचारपूस

Aprna