HW News Marathi
महाराष्ट्र

मी मुख्यमंत्री नाही असं मला वाटतच नाही देवेंद्र फडणवीसांच अजब विधान!



नवी मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस एक वाक्य चर्चेत होतं ते म्हणजेच , मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन… असं निवडणूक प्रचाराच्या भाषणा दरम्यान बोललेलं वाक्य आणि आता पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मन की बात’ सांगितली आहे. आता तर चक्क त्यांनी मी मुख्यमंत्री नाही असं मला वाटतच नाही, असं जाहीर विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला. हे विधान करून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना तोंड फोडले आहे. मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे, असं फडणवीस म्हणाले.

जनतेनेही कधी मी मुख्यमंत्री नसल्याचं जाणवू दिलं नाही

गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला जनतेनेही कधी मी मुख्यमंत्री नसल्याचं जाणवू दिलं नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम करत आहे. ज्या दिवशी मला जनतेचा आशीर्वाद मिळेल त्या दिवशी इथे मी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येईल. त्यामुळे त्याची काळजी घेऊ नका. मी नक्की येईल. तुमचं निमंत्रण मी आजच स्विकारतो, असंही ते म्हणाले.मला तर वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. गेले दोन वर्ष सातत्यानं राज्यभर फिरतोय. लोकांचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही. तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाचं, असंही फडणवीस म्हणाले.

दोन वर्षानंतर पंकजा मुंडे बरसणार

दसरा मेळाव्यात पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासह राज्य सरकार पंकजा मुंडे यांच्या निशाण्यावर राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अतिवृष्टीमुळे बीडसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांना अजूनही मदत मिळालेली नाही, या मुद्दयावरून त्या सरकारला घेरण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ऊस तोड कामगारांच्या प्रश्नांकडेही त्या सरकारचे लक्ष वेधण्याची शक्यता आहे. खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले नव्हते. त्यानंतर पंकजा यांनी मनातील खदखद बोलून दाखवली होती. त्यामुळे पंकजा मुंडे त्यावर काय भाष्य करतात का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.


 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नालासोपाऱ्यातील ९ महिन्याच्या गर्भवती महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

News Desk

“शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही”, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

Aprna

‘त्या’ ट्वीटनंतर शरद पवारांनी सचिनला दिला ‘हा’ सल्ला, म्हणाले….!

News Desk