HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

‘मला आंदोलनाची सवय नव्हती पण…’ प्रितम मुंडे याचं वक्तव्य!

बीड।गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी होणाऱ्या अतृष्टीने शेतकरी पुरता हैराण झाले आहेत.आणि याचाच फटका मराठवाड्याला देखिल बसला आहे. तर या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने मदतीची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह खासदार प्रीतम मुंडे या देखील उपस्थित होत्या. या वेळी खासदार मुंडे यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडी सरकारवर चांगलीच टीकेची झोड उठवली आहे.

पालकमंत्र्यांच्या या निमित्ततरी बीड जिल्ह्यातील बातम्या छापून आल्या

बीडच्या पालकमंत्र्यांना परळीच्या बाहेर बीड जिल्हाच माहिती नव्हता. मात्र, अतिवृष्टीमुळे त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेताच्या बांधावर का होईना, बीड जिल्हा तरी पाहिला अशी टीकाही खासदार प्रीतम मुंडे यांनी केली. पालकमंत्र्यांच्या या निमित्ततरी बीड जिल्ह्यातील बातम्या छापून आल्या असा चिमटा त्यांनी काढला.

राज्याचे सामजिक व न्याय तथा विशेष सहाय्य पद याना शोभेल असेच आहे

बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालाय समोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनास संबोधन करण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे तर जिल्ह्याच्या खा डॉ प्रीतम मुंडे याच्या उपस्थित हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलातांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्याचे सामजिक व न्याय तथा विशेष सहाय्य पद याना शोभेल असेच आहे नाव न घेता धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे याची लगावला खोचक टोला म्हणल्या हे तर समाजाचे”अ” कल्याण करणारे मंत्री आहेत. यांनी शेतकऱ्यांचे नुकसान पाहणी दौरा केला नसून यांनी लोकांच्या भावना तुडवण्याचं पाप यांनी केले आहे.कश्यबद्धल तुम्ही एवढा सत्कार समारंभ केले कोणती एवढी कामगिरी केली होती?ज्याच्या मुळे तुम्हला एवढे समारंभ घ्यावे लागले. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला टोला , तर पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणल्या की, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पाहणी करण्याऐवजी त्यांना नुकसानीची भरपाई देण्या ऐवजी तुम्ही तुमचे परिवार संवाद यात्रा करायच्या हे तुम्हला शोभते का ?

 

Related posts

‘असा’ लागणार दहावीचा निकाल! वर्षा गायकवाडांनी दिली माहिती

News Desk

निलेश लंकेंचा थेट कोविड सेंटरमध्ये मुक्काम! रुग्णसेवेचा अहोरात्र सपाटा सुरुच

News Desk

वायएसआर काँग्रेस-टीडीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत २ नेत्यांचा मृत्यू

News Desk