HW News Marathi
महाराष्ट्र

‘राज ठाकरे यांच्या भेटीत काय घडलं हे मोदी-शहांना सांगणार,’ चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान!

नवी दिल्ली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भेटीघाटी सत्र सुरू आहे. तर काल देखील चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात भेट झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असून राज यांच्यासोबत झालेल्या भेटीतील तपशीलावर चर्चा करणार आहे.

कोणा कोणाची घेणार भेट

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. दिल्लीत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, मंत्री डॉ. भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार आणि इतर नव्या मंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यासाठीच दिल्लीत आलो आहे. इतक्यात काही संघटनात्मक बदल होतील असं वाटत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते राम शिंदे, संजय कुटे, जयकुमार रावल आणि श्रीकांत भारतीय उपस्थित होते.

संघटनात्मक काम यावर चर्चा होईल

राज ठाकरे यांच्याशी अपघाताने नाशिकमध्ये भेट झाली होती. त्यामुळे काल आमची भेट झाली. त्यांनी चहासाठी बोलावलं होतं. आता दिल्लीत आलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. त्यांनी भेट दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, राज्यातील संघटनात्मक कामं यावर चर्चा होईल. यावेळी राज यांच्यासोबत झालेली भेट आणि भेटीतील चर्चेचा तपशीलही त्यांना देण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पंकजा मुंडे दिल्लीत येणार

दरम्यान, येत्या सोमवारी पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार सुद्धा दिल्लीत येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच मीडियाला भाजप कधीच कळली नसल्याचंही ते म्हणाले.दिल्लीत भाजपची खलबतं

दिल्लीत भाजपची एक बैठक पार पडणार असल्याचं सांगितलं जातं. भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य दिल्लीत दाखल झाले आहेत. आता देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार ही दिल्लीत दाखल होणार आहेत. जयकुमार रावल, राम शिंदे आणि संजय कुटेही दिल्लीत आल्याने भाजपची बैठक होणार असल्याचं समजतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो! – नाना पटोले

Aprna

“लाज वाटली पाहिजे तुम्हाला…,” पुणे पोलिसांवर चित्रा वाघ संतापल्या

News Desk

काहीतरी पदरात पाडून घ्यावे याच हेतूने अशोक चव्हाण आणि केसरकरांची नाराजी !

News Desk