HW News Marathi
महाराष्ट्र

“देशांमध्ये सेलिब्रेशन करण्याचा पायंडा पडला असेल, तर आपण देखील मोदींच्या…” संजय राऊतांच वक्तव्य

मुंबई। शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना पत्र लिहलंय. पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्टसिटीच्या नावाखाली 700 कोटींच्या निधीबाबत झालेल्या गैरव्यवहाराबाबत सोमय्यांना हे पत्र लिहलं आहे. 11 ऑक्टोबरला संजय राऊतांनी हे पत्र लिहलं होतं. भाजपची सत्ता असणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्मार्ट सिटी योजनेत 700 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला आहे. आणि या नंतर लगेच कोरोना लसीकरणाच्या संदर्भात वेगवेगळे आकडे समोर येत आहेत. कोणी म्हणतोय शंभर कोटी डोस झाले, कोणी म्हणते 33 कोटी डोस झाले, तर कोणाला दुसरा डोस मिळालाच नाही, पण या देशांमध्ये आता सर्वकाही सेलिब्रेशन करण्याचा पायंडा पडला असेल, तर आपण देखील मोदींच्या या उत्सवांमध्ये सामील होऊ या. आणि देशात मजबूत सरकार आलेलं असताना बांगलादेश आणि काश्मीर मधील हिंदू अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावर अत्याचार होत आहे.हे सरकारला आव्हान आहे.

अशी आपण 100 नावं जाहीर करणार

विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवडमधला घोटाळा हे तर पहिलं नाव आहे. अशी आपण 100 नावं जाहीर करणार आहे, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे. याविषयी कालच संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना पत्र लिहिलं. या घोटाळाप्रकरणी ईडी आणि सीबीआय कारवाईसाठी पाठपुरावा करण्याचं आव्हान केलं आहे. तसेच, सोमय्या या माहितीच्या आधारे ईडीकडे घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाठपुरावा करतील, अशी संजय राऊत यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. ईडी, सीबीआय चौकशीसाठी सोमय्यांनी पुढाकार घ्यावा, असं आव्हानही संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना दिलं आहे.

नियम धाब्यावर बसवून घोटाळा

म्हणूनच आज देखील राऊत हे माध्यमांशी बोलत होते की, पिंपरी चिंचवड घोटाळा जे घोटाळे सुरू आहेत ते 2018 ते 2019 मध्ये झाले ते बाहेर काढत आहेत.पंतप्रधान नरेंद मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या पिंपरी चिंचवड मधे मोठा घोटाळा झाला आहे.त्यामध्ये कोण आहे कोणत्या मोठया नेत्यांच्या आजूबाजूला फिरणाऱ्या क्रिस्टल कंपनीला नियम धाब्यावर बसवून घोटाळा झाला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. जे घोटाळे उघड करत आहेत त्यांना त्याची कागदपत्रे देत आहे त्यांनी यावर अभ्यास करावा.राजकीय पक्ष कोणीही असो तो घोटाळा असतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न

News Desk

देश येड्यागबाळ्यांच्या हाती आहे असेच दानवे यांना म्हणायचे आहे काय?

News Desk

अनिल देशमुखांच्या मागे ‘सीबीआय’चा सपाटा; मुंबई, पुण्यासह १२ ठिकाणी धाडी

News Desk