HW News Marathi
महाराष्ट्र

HW न्यूजचा इम्पॅक्ट! पंकजा मुंडेंनी पिडीत कुटुंबाची घेतली भेट

बीड | बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा येथील आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्काराची घटना घडली होती याविषयी HW न्यूज नेटवर्क ने या घटनेला गंभीर्यने घेतले आणि याची सखोल बातमी लावली या बातमीची दखल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी नुकतीच घेतली आहे.

पंकजा मुंडे यांनी या झालेल्या घटनेची निंदा व्यक्त करत म्हणल्या की, ही घटना अतिशय संतापजनक आणि घृणास्पद आहे, यातील आरोपींवर जास्तीत जास्त कठोर शासन व्हावे आणि संपूर्ण गुप्तता पाळुन याचा वेगाने तपास करावा अशी मागणी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, पिडित बालिकेचे वडिल व कुटुंबातील अन्य सदस्यांनी नुकतीच पंकजाताईंची भेट घेऊन न्यायाची मागणी केली.

डोंगर पिंपळा येथील आठ वर्षीय अल्पवयीन बालिकेला गावातील तरुण किरण रामभाऊ शेरेकर (वय २३) याने १९ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घरात बोलावुन तिच्यावर बलात्कार केला. एका गरीब व अल्पवयीन मुलीच्या बाबतीत घडलेला हा प्रकार अतिशय निंदनीय, संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारा आहे. या घटनेनंतर सदर मुलगी व तिचे आई वडील प्रचंड तणावाखाली व दहशतीखाली आहेत.या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केलेली असली तरी आरोपीला जास्तीत जास्त कठोर शासन होणे आवश्यक आहे. आपण या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे, घटनेचा संपुर्ण गुप्तता पाळुन वेगाने तपास करावा आणि आरोपीस कडक शासन करावे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे.

पीडित कुटुंबियांनी पंकजा मुंडे यांची घेतली भेट

पिडित बालिकेचे वडिल व कुटुंबातील अन्य सदस्यांनी नुकतीच पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यांनी हे संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांना फोन केला व आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्यास सांगितले. तथापि, अशा प्रकरणाची वाच्यता अथवा चर्चा करणे किंवा क्रेडिट घेणे हे आपल्या तत्वात बसत नसल्याने याविषयी आपण कुठेही बोलले नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus : राज्यातील सरकारी कार्यालये ७ दिवसांसाठी राहणार बंद ?

swarit

#CoronaVirus : राज्यातील सर्व शहरांत कलम १४४ लागू, तर सरकार कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५ टक्के

swarit

#CoronaVirus : शेअर मार्केटमधील पडझड अजूनही सुरूच, सेंसेक्स तीन हजार अंकांनी कोसळला

swarit