HW News Marathi
Covid-19

औरंगाबादमध्ये आज १७ नव्या रुग्णांची भर, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४९५ वर

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. राज्यात काल (८ मे) कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ६३ झाली आहे. औरंगाबादमध्ये आज (९ मे) नवे १७ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आता औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४९४ वर पोहोचली आहे. या सर्वांवर मिनी घाटी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये आज वाढलेले शहरातील संजयनगर,मुकुंदवाडी (६),कटकट गेट(२), बाबर कॉलनी (४), आसेफीया कॉलनी (१),सिल्क मिल कॉलनी (१), रामनगर-मुकुंदवाडी (१), भवानीनगर, जुना मोंढा (२) या ठिकाणी रुग्णांची संख्या आढळून आली आहे. यात ७ पुरूष, १० महिला आहेत.

https://twitter.com/InfoAurangabad/status/1258988354193911808?s=20

औरंगाबादमध्ये काल एका दिवसात १०० कोरोना रुग्णांची भर पडली आहे. औरंगाबादमध्ये कालपर्यंत ४७८ कोरोना रुग्णांची संख्या झाली होती. औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधित एसआरपीएफ कॅम्प, सातारा परिसर (७३), जयभीम नगर (४), बेगमपुरा (४), भीमनगर, भावसिंगपुरा (१), शाह बाजार (१), न्याय नगर, गारखेडा परिसर (१), लघु वेतन कॉलनी, मुकुंदवाडी (१), बायजीपुरा (१), कटकट गेट (१), सिकंदर पार्क (१), संजय नगर (७), कबीर नगर (१) या परिसरातील आहेत. तर ग्रामीण भागातील खुलताबाद येथील एक कोरोनाबाधित रुग्ण आहे. यामध्ये ८८ पुरूष आणि ११ महिला रुग्णांचा समावेश आहे. या शिवाय काल २२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या १४२ रुग्ण मिनी घाटीत (जिल्हा सामान्य रुग्णालय) उपचार घेत असल्याचे या रुग्णालयाच्यावतीने सांगितले आहे.

औरंगाबादमध्ये १५ मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. या रुग्णानंतर बाधितांचा आकडा हळूहळू वाढू लागला. दीड महिन्यात ५३ रुग्ण आढळले. मात्र, गेल्या १५ दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. आज औरंगाबादमध्ये आज (९ मे) नवे १७ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आता औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४९४ वर पोहोचली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शाळा नाही तरी जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झालेच पाहिजे !

News Desk

वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील, राज्य सरकारचा निर्णय

News Desk

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी केली कोरोनावर यशस्वीपणे मात, आज रुग्णालयातून घरी सोडणार

News Desk