Site icon HW News Marathi

पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवित राज्यपालांविरोधात केले निदर्शन

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे आज पुणे (Pune) दौऱ्यावर आले आहेत. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या विधानानंतर राज्यात त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती, युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) आज (2 डिसेंबर) पुण्यात आले असताना त्यांना काळे झेंडे दाखवित निषेध नोंदविला आहे. राज्यपालांविरोधात आंदोलन करणाऱ्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुण्यातील राजभवनबाहेर युवक काँग्रेसने राज्यपालांविरोधात निदर्शन केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यापालांना काळे झेंडे दाखवित विरोध दर्शविला. पुण्यात राज्यपालांचे आगमन झाल्यानंतर पाषाण येथे राज्यपालांविरोधात आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला. या पार्श्वभूमीवर पुण्यात राजभवनाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राज्यपाल नेमके काय म्हणाले

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. राज्यपालांनी कार्यक्रमादरम्यान म्हणाले, “तुमचा आदर्श कोण आहे. जेव्हा यापूर्वी विचाले जात होते. तेव्हा ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’, अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, आता महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत.”

 

Exit mobile version