HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर घाटकोपरमध्ये मनसेकडून स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्यास सुरुवात

मुंबई | घाटकोपरमध्ये मनसे शाखेबाहेर हनुमान चालीस लावण्यास सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा अनथा हनुमान चालीसा लावा, असा इशारा त्यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून त्यांनी महाविकासआघाडी सरकारला दिला. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आज (३ एप्रिल) मशिदीवरील भोंग्यांविरोधात मनसैनिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. घाटकोपर पश्चिम येथे मनसे शाखामध्ये महेंद्र भानुशाली यांनी हनुमान चालीसा लावण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळाली आहे. 

राज ठाकरे यांचा आदेश मनसे म्हणून पालन करणे हा माझा धर्म आहे. म्हणून मी त्यांची सुरुवात केली आहे. आजपासून रोज हनुमान चालीसा लावणार आहे. हिंदू संस्कृतीचे ज्या आरती आहेत ते येथे वाजणार, असे भानुशाली यांनी टीव्ही ९ शी बोलताना माहिती दिली. तब्बल दोन वर्षानंतर काल (२ एप्रिल) गुढीपाडवा निमित्ताने दादर शिवाजी पार्कमध्ये मनसेचा मेळावा पार पडला. यावेळी मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकाल, महाविकासआघाडीची स्थापना, जेलमध्ये राहिलेले लोक मंत्री झाले, सरकारमधील दोन मंत्री तुरूंग आदी मुद्यांवर सरकारला घेरले.

राज ठाकरे नेमके या म्हणाले

“माझा कोणत्याही धर्माच्या प्राथनेला विरोध नाही. परंतु, मशिदीवरील लावलेले भोंगे हे खाली उरवण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागेलच. जर सरकाने हा निर्णय घेतला नाही. तर मशिदीबाहेर भोंगे लागतील, तर त्यांच्यासमोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालीसा लावावी. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे. कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा उल्लेख नाही. जेव्हा धर्म तयार झाला. तेव्हा लाऊडस्पीकर अस्तित्वात होता का? , बाहेरच्या देशात जाता. तिथे कोणत्याच मशिदीवर लाऊडस्पीकर नसतो. तुम्हाला प्रार्थना करायची असेल तर ती तुमच्या घरात करा, असे परदेशातील शासन आहे.” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा समाज आक्रमक, १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा!

News Desk

“महाराष्ट्र तुफां के साथ हमेशा खेला है”, चाकणकरांचे अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

News Desk

राज्य सरकार धनगर समाजाची फसवणूक करत आहे !

News Desk