HW News Marathi
महाराष्ट्र

कवठेमहांकाळमध्ये रोहित आर आर पाटलांचा दणदणीत विजय; १७ पैकी १० जागा जिंकत एकहाती सत्ता

मुंबई | कवठेमहांकाळ नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना विजयी मिळवत राजकारणात दमदार एॅन्ट्री केली आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनलला १० आणि शेतकरी विकास पॅनलला ६ जागांवर विजय मिळाला असून १ जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. “१९ तारखेला निकाल स्पष्ट होईल,  त्यावेळी माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही,” या विधानामुळे कवठेमहांकाळ नगरपंयायत चर्चेत आली. 

“हा विजय हा कवठेमहांकाळमधील सर्वसामान्य माणसाचा आहे. आम्ही विकासाची मोहित घेऊन त्यांच्या पुढे गेलो. कवठेमहांकाळमधील शहरातील लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. तो विश्वाससार्थ करण्याचा दृष्टीने आमची  वाटचाल नक्की राहिली. हा विजय विनंम्रतेने साजरा करावा,  मी माझ्या सहकार्याना सांगतोय,” असे आवाहन रोहित पाटील करत विजयानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

प्रचारादरम्यान रोहित पाटील नेमका काय म्हणाले

राष्ट्रवादीच्या शेवटच्या प्रचार सांगता सभेत रोहित पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. रोहित पाटील म्हणाले, “१९ तारखेला निकाल स्पष्ट होईल, त्यावेळी माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आत्ता ज्यांच्याहाती १५ वर्षे सत्ता होती. नगरपंचायत होती आज तेच लोक आदर्श नगरपंचायत घडविण्यासाठी एकत्र आलो आहे,” असे म्हटले.

कवठेमहांकाळ नगरपंचायत निकाल

रोहित पाटील यांचे राष्ट्रवादी पॅनेल – १०

शेतकरी विकास पॅनल – ६ जागी 

अपक्ष – १  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारामतीमध्ये कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

News Desk

येवला औद्योगिक वसाहतीत सर्व पायाभूत सुविधा पूर्ण; नवउद्योजकांना गुंतवणूकीसाठी प्रोत्साहित करावे! – छगन भुजबळ

Aprna

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत कोणत्याही वर्गातील विद्यार्थी अर्ज करू शकतील

News Desk