Site icon HW News Marathi

नांदुरा तालुक्यात अवैध वृक्षांची कत्तल; वनविभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष

मुंबई | नांदुरा (Nandura) तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असून याकडे वनविभाग (forest department) जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक नागरिक आरोप करत आहेत. ब नांदुरा ते बुलढाणा (Buldhana) या रोडवर रस्त्याच्या बाजूलाच शहरापासून काही हाकेच्या अंतरावर झाडांचे अवैध कत्तल करून ठिकठिकाणी लाकडांचे ढीगारे पडलेले आहेत. बऱ्याच वेळा वनविभागाचे अधिकारी या रस्त्याने ये-जा करत असतात. मात्र, या अवैध वृक्षांची कत्तल केलेल्या लाकडांवर कारवाई का करत नाही. अवैध वृक्षांची कत्तल करणाऱ्यांची व वनविभागाच्या अधिकाऱ्यांची हात मिळवणी झालेली आहे का? असा प्रश्न शहरवासी उपस्थित करत आहे.

एकीकडे तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत असून दुसरीकडे विभागाच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत असतांना तालुक्यात मात्र मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षांची कत्तल होत असल्याने वनविभागाचे अधिकारी करतात तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

शासन एकीकडे वृक्षारोपणासाठी मोहीम राबवत आहे. त्यासाठी शासनाच्या तिजोरीतील कोट्यावधी रुपये वृक्षारोपणासाठी खर्च केले जातात. मात्र, पन्नास ते साठ वर्षांपूर्वीच्या जुन्या झाडांना वाचविण्यासाठी एकही उपायोजना केल्या जात नसल्याचे दुर्दैव आहे.
त्यामुळे वनविभागाचे अधिकारी अवैध वृक्षांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करणार का हे पाहणे आता गरजेचे आहे.

नांदुरा ते मलकापूर बायपास वर एका शेतात मोठया प्रमाणातमध्ये लाकडाचे ढिग लागले. सहजपणे नजरेस पडेल आशा ठिकाणी हे लाकडाचे ढिग आहे. पण, हे ढिग वनविभागाचे अधिकारी यांना दिसत नाही. मात्र, सर्व सामान्य जनतेला दिसतात असून वनविभागाच्या अधिकारी यांना दिसत नाही का ? अशा प्रश्न उपस्थित होत आहेत.

Exit mobile version