HW News Marathi
महाराष्ट्र

दिशा सालियान प्रकरणात न्यायालयाकडून राणे पिता-पुत्रांना अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई | दिशा सालियान प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. मुंबईतील दिंडोशी न्यायालयाकडून नारायण राणे आणि नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे पिता-पुत्रांना दिलासा मिळलाा आहे. न्यायालयाने काही अटी, शर्तींवर दिशा सालियान प्रकरणात आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी पिता-पुत्रांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.  या पिता-पुत्रांना १५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.

या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर नितेश राणेंनी विधींडळातून प्रतिक्रिया दिली. नितेश राणे म्हणाले, “न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आणि न्यायालयाचे आभार मानले. आम्ही अन्यायविरोधात आवाज उठवत राहणार आहोत. आमच्या विरोधात राज्य सरकार षडयंत्र रचले असून लोकप्रतिनिधींचा अधिकार न्यायालयाने अबाधित ठेवला आहे. महाविकासआघाडी सरकारने सालियान कुटुंबियांवर दबाव टाकला आहे. सरकारमधील एका मंत्र्यांचे या प्रकरणात संबंध आहे. मंत्रिपद ठिकवण्यासाठी काही जण राणेंवर टीका करतात, असा आरोपाच्या फैरी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांचे आरोप गंभीर, चौकशी करा!; नाना पटोलेंची मागणी

Aprna

मुंबईच्या हद्दीत ८ मार्चपर्यंत जमावबंदी आदेश जारी

Aprna

अनिल देशमुखांची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका!

News Desk