HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive : पाण्यासारखा आकार घ्यावा, हीच आईची शिकवण! – रोहित पाटील

मुंबई |  वय वर्ष अवघे २३, पाठीशी अखंड महाराष्ट्राने भरभरून प्रेम केलेल्या लोकनेत्या पित्याचे आशीर्वाद, सोबत जनतेची साथ आणि मनात जनसेवेचा ध्यास घेतलेल्या अशा एका तरुण नेत्याच्या राजकीय प्रवासाला नुकतीच दमदार सुरुवात झालीय आणि हा तरुण नेता आहे. रोहित आर. आर. पाटील. रोहित पाटलांनी काहीच दिवसांपूर्वी विरोधकांना पराभवाची धूळ चारत कवठे-महाकाळ नगर पंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणून आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले. या पार्श्वभूमीवर, राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये फक्त त्यांच्याच नावाची भरभरून चर्चा आणि कौतुक सुरूय आणि ह्याच निमित्ताने आज आपल्यासोबत आहेत. खुद्द रोहित आर आर पाटील. यांची मुलाखत एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधी गौरी टिळेकर यांनी घेतली आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या कवठे-महाकाळ नगर पंचायतीचा विजय हा तसा जबाबदारीचा आहे. आतापर्यंत जेवढे प्रेम आबांना मिळाले नव्हते. त्याहीपेक्षा जास्त प्रेम सुमन ताईना तिथल्या सर्व सामान्य लोकांनी  दिले. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्या ग्लासमध्ये आपल्याला टाकले जाते. त्या ग्लासचा आकार त्या पाण्याला घेता आला पाहिजे. त्याच पद्धतीने आईने सुद्धा राजकारणाचा आकार घेतला, असे मत रोहित. आर. आर. पाटील यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे.  गावाकडे शिकलो, याचे शल्ल्य अजिबात नाही. नगरपंचायती निवडणुकीच्या प्रचाराला प्रत्येकाच्या घरोघरी आणि प्रत्येक वॉर्डमध्ये गेलो. आज जर तुम्ही मला तिथल्या कोणत्याही वॉर्डमध्ये घेऊन गेलात तर मी तिथले प्रश्न काय आहेत. हे मी सांगू शकतो. लोकांच्या कुठेच कमी पडलो नाही पाहिजे, यांची कमी आणि दक्षता नेहमीच घेत आलो आहे. काम केल्यानंतर लोक संधी देत असतात, असा विश्वास  रोहित आर. आर. पाटील यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हटले आहे.

ग्लासचा आकार त्या पाणी घेते, त्याचप्रमाणे आईने सुद्धा राजकारणात आकार घेतला.

विधानसभा निवडणुकीत आईसाठी तुम्ही मतदार संघ पिंजून काढला होता, त्यांच्याकडे तुम्ही बघता तेव्हा आईकडून काय प्रेरणा मिळते, या प्रश्नावर रोहित पवार एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले, ” आबा असताना कोणीही राजकारणात सक्रीय नव्हते. आई सुद्धा एक गृहिणी होती. आबांनंतर तिथल्या लोकांनी जी जबाबदारी दिली. त्या परिस्थितीत गृहिणी म्हणून त्या घरातून बाहेर पडल्या. लोकांची कामे आम्ही करत गेलो. लोकांचे प्रश्न आम्ही समजून घेऊ शकलो. सर्व सामान्यामध्ये ताईचा वापर होता. ताईंनी लोकांशी चांगला संपर्क ठेवला. त्याचे फळ आम्हाला गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळाले. आतापर्यंत जे आबांना मिळाले नव्हते. त्याही पेक्षा जास्त प्रेम ताईना तिथल्या सर्व सामान्य लोकांनी दिले. मी आईकडे बघितले, ती गृहिणीपासून झालेल्या प्रवासाची सुरुवात आज फार चांगल्या मतांनी निवडून आलेली आमदार आहे. काम करत असताना कुठे तरी लोकांची नाळ आपल्याशी जोडली गेलेली आहे. त्या मतदार संघात काम करत असताना फक्त प्रेम आणि कामाच्या जोरावरती तिथल्या लोकांना आम्ही बांधून ठेवले आहे. त्यामुळे निश्चितपणे मला विश्वास आहे. सर्व सामान्यासाठी आम्ही जोपर्यंत काम करू तोपर्यंत तिथली सर्व सामान्य जनता आम्हाला अंतर देणार नाही. आईकडून बऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्या ग्लासमध्ये आपल्याला टाकले जाते. त्या ग्लासचा आकार त्या पाण्याला घेता आला पाहिजे. त्याच पद्धतीने आईने सुद्धा राजकारणाचा आकार घेतला. आणि त्यापद्धतीने प्रवास चालू केला. आज ती आमदार म्हणून ती काम करते. तिथले लोक खूश आहेत, असा मला विश्वास आहे.”

आबांचा मुलगा म्हणून हा वारसा जबाबदारीचा 

 कवठे-महाकाळ नगर पंचायतीचा विजयवर प्रश्न विचारल्यावर रोहित आर. आर.पाटील एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले, “हा विजय तसा जबाबदारीचा आहे. जो विश्वास लोकांनी माझ्यावर ठेवलेला आहे. तो विश्वास आपण सार्थ ठरविला पाहिजे. आणि सार्थ ठरविण्यात मी यशस्वी झालो पाहिजे. ही भावना माझ्यासह माझ्या सहकार्यांमध्ये देखील आहे. त्याचबरोबर निवडून आलेल्या पदाधिकारी आणि नगरसेवकांची देखील आहे. त्या शहरातील प्रलंबित प्रश्न आहे ते सोडविले गेले पाहिजे. जरी आज नगरपंचायतीच्या सत्कार आणि कौतुक होत असेल तरी फारसे न अडकता, आम्ही कामाला सुरुवात केलेल्या आहे. त्या ठिकाणी आम्ही दुसऱ्या दिवशी जी कामे प्रलंबित होती. यादीवर घेऊन ती सोडविण्याचे काम आम्ही चालू केलेले आहे. त्यामुळे निश्चितच आबांचा मुलगा म्हणून हा वारसा जबाबदारीचा आहे. या दृष्टीकोनातूनच मी या वारसाकडे बघत आहे.” 

विकासाच्या दृष्टीकोनातून नगरपंचयतीची निवडूक लढविली आणि जिंकली

नगरपंचयातीच्या निवडणुकीच्या प्रचारनंतर तुम्हाला माझा बाप आठवले, हे रोहित आर. आर. पाटील यांचे वक्तव्यची प्रचंड चर्चा रंगली होती, यावर एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना ते म्हणाले, “जिथे वडील वाक्य प्रचार करणे अपेक्षित होते. तिथे बाप असे केले गेले. आणि कुठे तरी आता बाप काढला तर आम्ही कष्ट करून निकाल चांगला करू आणि त्या दिवशी माझा बाप आठवेल, असे मी माझ्या भाषणामध्ये बोलो होतो. तिथल्या सर्व सर्वसामान्य लोकांनी आम्हाला आशिर्वाद दिला. गेल्या २-३ वर्षात चांगले काम करत होतो. परंतु, त्याचबरोबर आबानंतर ताई असतील त्यांच्यासोबत आम्ही केलेले काम असेल. सर्वसामान्य लोकांसाठी आणि तिथल्या आरोग्या आणि शिक्षणाचे विषय असतील आम्ही सर्वसामान्य लोकांच्या मनात घर केले होते. त्यामुळे तेथे सर्वसामान्य जनतेने निवडणुकीत आम्हाला आशिर्वाद दिला. कोणावरही टीका न करता आम्ही ही निवडून विकासाच्या दृष्टीकोनातून लढविली. हे सर्व तिथल्या लोकांना ते भावले. आणि आम्ही निवडून जिंकली.” 

 आबांचा सहवास लाभला असता तर अजून चांगली वाटचाल करू शकलो असतो

आबांचा सहवास कमी लाभला आणि जेवढा सहवास लाभला त्यातून तुम्ही काय शिकला, यावर रोहित. आर. आर. पाटील यावर ते म्हणाले, “आज आबा असते तर मला अजून चांगले मार्गदर्शन मिळाले असते. आज जी वाटचाल चालली आहे. ती त्यापेक्षा जास्त चांगली वाटचाल आम्ही आबा असते तर चांगली वाटचाल करू शकलो असतो. आता आलेल्या परिस्थिती तोंड देत संघटना, पक्ष ठिकला पाहिजे, वाढला पाहिजे ही आमच्या सर्वांची भावना आहे. आबांकडून लोकांकडून ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण करत फार चांगल्या प्रमाणात आपण काम केले पाहिजे, ही आबांची दृष्टी होती. तोच दृष्टीकोन आज आमचा सुद्ध आहे. सर्व सामान्याच्या आयुष्यावर थेट फरक पडेल, अशी कामे आपल्या मतदारसंघात आणि गावागावत केली पाहिजे. आणि सर्व सामान्य माणसाला त्यांचा फायदा झाला पाहिजे. हा दृष्टीकोन जो आबांचा होता. तो आम्ही सर्वजण शिकलोय. त्याच भावनेतून आम्ही सर्व तरुण सहकारी काम करतोय. खरेतर आबांच्या आयुष्यात घडत असताना असे अनेक प्रसंग होते. ज्यात आबा घडत गेले. मला निश्चित पणांने विश्वास आहे. सुरुवातीच्या काळात आबांवर अनेक हल्ले केले गेले. हे सुद्धा तिथल्या मतदारसंघातील लोकांना ते माहिती आहे. त्याकाळी आबांनी जो संयम दाखविला. आबा त्यांचे कार्य करत राहिले. तिथल्या जनतेने आबांना स्वकारले. या निवडणुकीत एक प्रसंग असात होता की, आचारसंहिता १० वाजेपर्यंत असताना. एका घरात आम्ही तिघेजण चहापाण्यासाठी गेलो होतो. आम्ही प्रचार करायला या भावनेतून ५० भर लोक आले. तिथे आम्हाला थोडे अडविण्याचा प्रयत्न झाला. मुळात वेळ रात्री १० वाजेपर्यंतची होती. हा प्रकार ८.३० वाजता हा प्रकार घडत होता. पण, अशाही परिस्थितीत कुठेही आपण उथळपणा न दाखवता. संयम ठेवून त्या लोकांना समोरे जाणे हे त्या ठिकाणी गरजेचे होते. आणि आम्ही ते केले. हा जो काही प्रकार घडला तो लोकांना आवडला नाही. कवठे-महाकाळमध्ये त्या वॉर्डातील नगरसेवक सर्वात जास्त मतांनी निवडून आला आहे. लोकांना काय पाहिजे, कशा पद्धतीने तेथे काम होणे अपेक्षित आहे. हे सर्व आम्ही लोकांसमोर ठेवले होते. त्यामुळे लोकांना आम्हाल विजयी करत आशिर्वाद दिला.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानमध्ये कधी बॉम्ब फोडणार याची वाट बघतोय, मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

News Desk

जळगावात राष्ट्रवादीच्या बैठकीला भाजपच्या नगराध्यक्षाची हजेरी!

News Desk

गणेशोत्सवासाठी साकारलं गिरणगाव!

News Desk