HW News Marathi
महाराष्ट्र

संतापजनक! गर्भवती वनरक्षक महिला आणि पतीला माजी सरपंचाकडून मारहाण

सातारा | सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात एक पुरूष एका वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करताना दिसत आहे. सातारा तालुक्यातील पळसावड या गावी संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि सूर्याजी ठोंबरे यांनी सातारा पोलीस ठाण्यास स्वत: या प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये वनरक्षक महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करणारा व्यक्ती पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर त्यांची पत्नी प्रतिभा जानकर या दोघांनी मिळून वनरक्षक महिला आणि तिच्या पतिला मारहाण केली आहे. वनरक्षक महिलाचे नाव सिंधू सानप आणि पति सूर्याजी ठोंबरे असे नाव आहे. जानकर दाम्पत्यांविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही वनरक्षक महिला तीन महिन्याची गर्भवती असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या व्हायरल व्हिडिओवर राज्यातील सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. 

नेमके काय आहे प्रकरण

सिंधू सानप यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, “मला न विचारता वन मंजूर दुसरीकडे का नेले, या कारणावरून वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी रामचंद्र जानकर व त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. परंतु, या दाम्पत्यांच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. जानकरांनी सिंधू सानप यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. परंतु पैसे देण्यास सिंधू सानपांनी नकार दिल्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली. सिंधू सापन यांच्यासोबत त्यांचे वनरक्षक पती सूर्याजी ठोंबरे यांना देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पावसाळी अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षाची निवड होणार – बाळासाहेब थोरात

News Desk

उद्धव ठाकरेंच्या ‘या’ मागणीला आनंद महिंद्रांनी दर्शवला पाठिंबा

News Desk

शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीदिनी गर्दी करु नका, संयम पाळा, मुख्यमंत्र्याचे आवाहन!

News Desk