Site icon HW News Marathi

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर

मुंबई | सन २०२१ या वर्षात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार (Yashwantrao Chavan State Literary Award) जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या परीक्षण समितीच्या निकालपत्रानुसार ३५ विविध वाङ्मय प्रकारांसाठी ३३ लेखक, साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांकडून विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तके स्वीकारण्यात येतात. सन २०२१ च्या पुरस्कार स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या प्रवेशिकांच्या अनुषंगाने  १० सप्टेंबर २०१२ व  २ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयानुसार स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२१ जाहीर करण्यात आले आहेत.

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. सदर पुरस्काराच्या यादीमध्ये कोणत्या वाङ्मय प्रकारास कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्याचे नांव, तसेच संबंधित लेखकाचे, पुस्तकाचे व प्रकाशन संस्थेचे नाव आणि पुरस्काराची रक्कम नमूद करण्यात आली असून, पात्र ठरविण्यात आलेल्या ३३ लेखक/ साहित्यिकांच्या नावाचे विवरणपत्र सोबत दिले आहे.

Exit mobile version