HW News Marathi
Covid-19

मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील ICU बेड्सची संख्या वाढवा, जयंत पाटलांचे निर्देश

सांगली | “सद्यस्थितीत जिल्ह्यात लक्षणे नसलेल्या कोरोणा बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत असून या रुग्णांमध्ये कोणतीही गुंतागुंतीची लक्षणे निर्माण होऊ नयेत यासाठी त्यांची अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने देखभाल करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता अतिदक्षता विभागांमध्ये बेडस् ची संख्या आवश्यक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात बेडस् ची व्यवस्था सर्व सुविधांसह २०० पर्यंत वाढविण्यात यावी”, असे निर्देश सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत.

सांगली जिल्ह्यातील नागरी परिसरात लॉकडाऊन केल्यानंतर देखील कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता पालकमंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ प्रशासना सोबत बैठक घेतली. जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन जयंत पाटील यांनी रुग्णांना कोणत्याही स्थितीत आवश्यक व गुणवत्तापूर्ण उपचार मिळालेच पाहिजेत, अशा सूचना केल्या आहेत. यादृष्टीने मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे सध्या असणाऱ्या बेडच्या संख्येमध्ये वाढ करून आयसीयू मधील बेड 200 पर्यंत वाढविण्यात यावेत, असे निर्देश वैद्यकीय महाविद्यालय याचे अधिष्ठाता डॉ. सुधीर ननंदकर यांना दिले.

“कोविड केअर सेंटरमधील रुग्णांमध्ये लक्षणे उद्भवल्यास त्यांना तात्काळ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये संदर्भित करण्यात यावे व आवश्यक उपचार द्यावेत”, असेही निर्देश जयंत पाटील यांनी यावेळी दिले आहेत. यावेळी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अधिग्रहित करण्यात आलेली खाजगी रुग्णालय, कोरोणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था यांचा आढावाही पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर कोव्हॅक्सिन लस टोचून घेऊ नका, भारत बायोटेकने दिला गंभीर इशारा

News Desk

पुण्यात आज १७६ नवे कोरोना रुग्ण आढळले तर १५७ जणांना डिस्चार्ज दिला

News Desk

ओमायक्रॉनच्या उपचार पद्धतीबाबत लवकरच निर्णय! – राजेश टोपे

Aprna