HW News Marathi
देश / विदेश

४१ वर्षांनी भारतीय हॉकी टीमनं रचला इतिहास, ऑलीम्पिकमध्ये कांस्यपदाचे मानकरी!

टोक्यो | भारताच्या हॉकी संघाची पदकासाठीची प्रतीक्षा तब्बल ४१ वर्षांनंतर पूर्ण झाली आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवलं आहे. अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केलं. भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे.

हार न मानता भारताचं जोरदार प्रदर्शन

१९८० साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने हॉकीत शेवटचं पदक जिंकलं होतं. यानंतर भारतीय संघाला एकदाही पदकाची कमाई करता आली नाही. परंतू टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रदीर्घ कालावधीची प्रतीक्षा संपवत भारतीय हॉकी संघाने पदकावर नाव कोरत, भारतीय हॉकीचे जुने दिवस पुन्हा एकदा आणले आहेत.

सामन्याच्या पहिल्या सत्रात जर्मनीचं संपूर्णपणे वर्चस्व पहायला मिळालं. टिमूर ओरुझने दुसऱ्या मिनीटाला गोल करत जर्मनीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. जर्मनीचा संघ हॉकीत गतीशील आक्रमणासाठी ओळखला जातो. संपूर्ण पहिल्या सत्रात जर्मनीने वारंवार भारतीय गोलपोस्टवर हल्ले करत भारतीय खेळाडूंना दडपणाखाली आणलं. ज्याचं उत्तर भारतीय खेळाडूंकडे दिसलं नाही. सुदैवाने पहिल्या सत्रात भारतीय संघाने एकपेक्षा जास्त गोल खाल्ला नाही.

चौथ्या सत्रात जर्मनीने आक्रमक खेळाला सुरुवात करत भारतावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. भारताचा बचाव भेदून जर्मनीने ४८ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर गोलची संधी निर्माण केली. यावेळी ल्युकास विंडफेडरने श्रीजेशचा बचाव भेदत जर्मनीची पिछाडी एका गोलने कमी केली होते.

रवीकुमार दहिया अंतिम फेरीत दाखल

टोक्यो ऑलीम्पिकमध्ये भारत कमालीची कामगिरी बजावत आहे. भारताच्या खेळाडूंनी आपली आगेकूच कायम ठेवली असून काल(४ ऑगस्ट) भारताच्या खात्यामध्ये अजून एक पदक निश्चित झालं आहे. फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारामध्ये ५७ किलो वजनी गटामध्ये भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहीया यानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव त्याने केला आहे. त्यामुळे भारताचं यंदाच्या ऑलिम्पिकमधलं चौथं पदक निश्चित झालं आहे. सुरुवातीला ५-९ अशा पिछाडीवर पडलेल्या रवीकुमारनं तीन महत्त्वाचे गुण कमावले. त्यामुळे रवीकुमारचा अंतिम फेरीत झोकात प्रवेश झाला आहे.

भारताच्या नावावर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तीन पदके

भारत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कमालीची कामगिरी करत आहे. लव्हलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीच्या सामन्यात टर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मेनेकडून पराभूत झाली आहे. सामन्यामध्ये लव्हलिनाने तिन्ही फेऱ्या गमावल्या. त्यामुळे लव्हलिनाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी लोव्हलिना तिसरी बॉक्सर बनली आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या बॉक्सरसमोर मात्र, लोव्हलिनाने चांगली लढत दिली. लोव्हलिनाच्या कांस्यपदकासह भारताच्या नावावर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आता तीन पदके झाली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दसऱ्याच्या नेत्यांकडून देशवासीयांना शुभेच्छा!

News Desk

दहशतवादी सय्यद सलाउद्दीनचा मुलगा एनआयएच्या ताब्यात

swarit

बिहार विधानसभा निवडणूकीत शिवसेना आणि माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडें आमने-सामने

News Desk