HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

अंनिसच्या हस्तक्षेप अर्जाला मान्यता, इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत होणार वाढ

Indurikar Maharaj

अहमदनगर | कायम वादग्रस्त वक्तव्य करणारे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन  त्यांच्या विरोधात संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात आज (१८ सप्टेंबर) सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने अंनिसच्या हस्तक्षेप अर्जाला मान्यता देत अंनिसला लेखी युक्तिवाद करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या अडचणी आता वाढणार आहेत. दरम्यान, यापुढील सुनावणीत इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात सरकारी वकिलासोबतच अंनिसचे वकिलही युक्तिवाद करणार आहेत.

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याविरोधात पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच प्रकरणी संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २८ ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी अंनिसकडून इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन त्यांना कायद्याच्या चौकटीत पकडण्यासाठी पुरेपुर प्रयत्न होणार आहेत.

नेमकी काय आहे प्रकरण?

“स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते” असं वादग्रस्त वक्तव्य महाराज इंदोरीकर यांनी केले होते. लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदोरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता.

Related posts

“काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा ‘चक्काजाम’ झालाय ?”, शेलारांचा बोचरा सवाल

News Desk

काँग्रसने नोटबंदी विरोधात थाळीनाद आंदोलन

News Desk

महाराष्ट्रातील निर्बंध शिथील होणार नाहीत ! बैठकीत तशी चर्चा नाही- राजेश टोपे

News Desk