HW News Marathi
महाराष्ट्र

नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या जमिन व्यवहाराची चौकशी सुरु

रत्नागिरी | नाणार रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याची विरोधकांनी मागणी लावून धरलेली असतानाच या प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जमिन व्यवहाराची चौकशी सुरू झाली आहे. तसेच रिफायनरीसाठी घेतलेल्या जमिनी परत देण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पाची चौकशी करण्यासाठी राजापूर प्रांत कार्यालयासह तलाठी कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तारळ, कुळवंडे, नाणार, साखर, सागवे, वाडापाल्ये, उपळे, विल्ये, डोंगर, कात्रादेवी या गावांमध्ये तक्रार स्विकृती कक्ष स्थापन केले जाणार आहे.

या कक्षांमध्ये तक्रार स्वीकारली जाणार आहे. ३१ मार्चपर्यंत भूमिपुत्रांकडून निवेदन आणि तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत. नाणारसह १४ गावांमध्ये जमीन विक्रीचे कोट्यावधींचे व्यवहार झाले होते. यावेळी परप्रांतीयांनी कवडीमोल भावाने जमिनी खरेदी केल्या होत्या. त्यामुळे भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही काही महिन्यापूर्वी जमीन खरेदी विक्री प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

एमआयडीसीने या प्रकल्पासाठी रायगड आणि रत्नागिरीत दोन जागांची पाहणी केली असून त्याचा अहवाल लवकरच मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. रायगड तालुक्यातील तळा आणि रत्नागिरी तालुक्यातील जयगड या त्या दोन जागा आहे. दोन्ही जागा ९ हजार एकर आहेत. त्यामुळे हा रिफायनरी प्रकल्प कोकणातच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी ज्या जमिनींचे खरेदी व्यवहार झाले होते, ते सर्व व्यवहार रद्द करण्यात येणार असल्याचे यापूर्वी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले होते.

“नाणार प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी ७ लाख रुपये एकराने त्यांच्या जमिनी विकल्या आहेत. हा प्रकल्प झाला तर त्याचे मूल्य ९० लाख एकरी होणार आहे. दलालांनी जमिनी लाटून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली आहे. २२४ गुजराती आणि मारवाडी लोकांनी या जमिनी विकत घेतल्या आहेत. त्यामुळे हे सर्व व्यवहार रद्द करण्यात येईल,” असं राऊत म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती उत्तम, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज!

News Desk

‘भाजप पाठोपाठ शिवसेनेचा राष्ट्रवादीलाही दणका!’

News Desk

अजित पवारांच्या आदेशाने कारवाई झाली असेल तर पुरावे द्या, तुमच्या वतीने त्यांची तक्रार करेन!

News Desk