HW News Marathi
महाराष्ट्र

…म्हणून मुख्यमंत्री विधानपरिषदेवर जाणार

मुंबई | मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच दैनिक सामनाला उद्धव ठाकरे यांनी दीर्घ मुलाखत दिली. संजय राऊत यांनी घेतलेल्या त्यांच्या या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारेदेखील त्यांना नंतर प्रिय होतात. त्यांच्या वॉर्डात जाऊन मोदी प्रचार करतात, ही नैतिकता आहे का? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर आणि भाजपवर जोरदार टीका केली. रामविलास पासवान त्यांच्याबद्दल काय बोलले होते? नितीशकुमार काय बोलले होते? या प्रश्नांवर आता बिहारमध्येच त्यांची आपापसात वाजतंय ,तरी ते एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. त्यामुळे तुम्ही तर नैतिकता शिकवूच नका. भाजपकडून राज्याला आणि देशाला नैतिकता शिकण्याची गरज नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत.

शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांना ठाकरे उत्तरे देत होते. विरोधी विचारधारा असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांसोबत आघाडी करत सरकार स्थापन करण्यावर भाजप सतत टीका करत आहे. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले की, केंद्रातील सरकारमध्ये अनेक पक्ष सहभागी आहेत. त्यांच्या विचारधारा एकच आहे का? त्यात किती पक्ष आहेत? त्यांचे किती विचार आहेत? नितीशकुमार आणि भाजपची विचारधारा एक आहे का? मेहबुबा मुफ्ती आणि त्यांची विचारधारा एक होती का? रामविलास पासवान आज त्यांच्यासोबत आहेत. त्यांची आणि भाजपची विचारधारा एक आहे का? या मुद्द्यांवर झालं गेलं गंगेला मिळाले असे म्हणायचे. आपण घरात गंगाजल आणून ठेवतो तसेच… अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपावर ताशेरे ओढले.

शुद्धीकरणाची लाँड्री तुमच्याकडेच आहे का?

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजप पक्ष या सरकारवर फक्त टीकाच करत आहे आणि याच टीकेचा समाचार घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस पक्षांमधून भाजपत गेलेल्या नेत्यांकडे बोट दाखवले आहे. पक्ष फोडून आलेली माणसे तुम्हाला चालतात. मग त्या पक्षासोबतच हात मिळवला तर काय फरक पडतो? त्या पक्षातले मोठमोठे नेते घेऊन भाजपातसुद्धा त्यांना समावून घेतलेच आहे ना? त्यांना आमदार, खासदार ही पदेही दिली.मग हे सुद्धा त्या विचारधारेवरच होते ना? अशा नेत्यांना शुद्ध करण्याची लाँड्री तुमच्याकडेच आहे का? किंवा मग गंगाजल घेऊन शिंपडत फिरता सगळीकडे अशा खोचक शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या प्रत्येक टीकेचे, आरोपांचे चोख प्रत्युत्तर दिले.

विधानपरिषदेवर जावे की विधानसभा लढवून विधानसभेत जावे याबाबतचा निर्णय येत्या दोन ते चार महिन्यात घेऊ, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. आता विधानपरिषदेच्या निवडणुका येत असून विधानसभेवर जायचं म्हणजे जो निवडून आला असेल त्याला राजीनामा द्यायला लावून माझे मत असे आहे की, ही जबाबदारी आली ती पार पाडण्यासाठी जर विधानसभेतून कुणालाही न दुखावता परिषदेत जाऊ शकत असेन तर का नाही जायचं?, असं मतही ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. मी मागच्या किंवा या- त्या दारातून आलो नसून मी छपरातून आलो आहे’, असे म्हणत ठाकरे यांनी विरोधकांना मिश्किल शैलीत उत्तर दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्पातील पारसिक डोंगरातील डावा बोगदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला

Aprna

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी अजित पवार यांच्याकडून अभिवादन

News Desk

राज्यातील १५१ तालुक्यांसह आणखी २५० मंडळांचा दुष्काळ यादीत समावेश

News Desk