HW News Marathi
महाराष्ट्र

इक्बाल कासकरला कारागृहात व्हीआयपी सेवा, ५ पोलीस कर्मचारी निलंबित

ठाणे । अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याप्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे. पाच पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. इक्बालचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये इक्बाल एका खासगी गाडीत बसून बिर्याणी खात असल्याचा पाहायला मिळाले होते. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इक्बाल सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात असून गुरुवारी त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी हा प्रकार घडला आहे.

इक्बाल कासकरला ठाणे कारागृहातून रुग्णालयापर्यंत नेणारे पोलीस कर्मचारी यासाठी जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पाच पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. उपनिरीक्षक रोहिदास पवार, कॉन्स्टेबल पुंडलिक काकडे, विजय हालोरे, कुमार पुजारी आणि सुरज मानवार या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यवतमाळमध्ये ११ शेतक-यांचा मृत्यू, काहींना अंधत्व

News Desk

८० वर्षांचा योद्धा! शरद पवार…

swarit

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाचा पहिला पुरस्कार मिळाला हे माझे भाग्यच!– नरेंद मोदी

Aprna