HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोना विरुद्ध लढण्यासाठी एकच डोस पुरेसा? बहुचर्चित लसीच्या चाचणीला भारतात परवानगी!

मुंबई। जगभरात सर्वजण अजूनही कोरोनाशी लढा देत आहेत. लसीकरण वेगानं सुरू आहे. कोरोनावर अजूनही ठोस असं औषध मिळालेलं नाही मात्र एक दिलासादायक बातमी येत आहे. भारतात बहुचर्चित लसीच्या तिसऱ्या ट्रायलसाठी परवानगी देण्यात आली आहे. भारतात Sputnik V नंतर आता रशियाच्या अजून एका लसीला परवानगी मिळाली आहे.

लस एकाच डोसनंतर चांगलं काम करेल

रशियाच्या Sputnik Light लसीच्या तिसऱ्या ट्रायलसाठी भारतात परवानगी देण्यात आली आहे. कंपनीकडून असा दावा करण्यात आला आहे की या लसीचा एक डोस कोरोना विरुद्धच्या लढाईत फायदेशीर असेल. याचा दुसरा डोस घ्यावा लागणार नाही. आता Sputnik V, कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस घेणं अत्यवश्यक आहे. अशामध्ये ही लस एकाच डोसनंतर चांगलं काम करेल असा कंपनीने दावा केला आहे.

दोन डोसच्या तुलनेत ही लस प्रभावी

मेडिकल जर्नल ‘द लँसेट’मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार स्पुतनिक लाइट ही लस 78.6 ते 83.7 प्रभावी ठरली आहे. इतर लसींच्या दोन डोसच्या तुलनेत ही लस प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. vaccine Sputnik Light या लसीला भारतामध्ये आपात्कालीन वापरासाठी तिसऱ्य़ा टप्प्यात मंजुरी मिळाली आहे. ही लस आली तर एक उत्तम पर्याय असेल. आता भारतात लसीकरण मोहीम वेगानं सुरू आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे ही लस आता भारतात किती प्रभावी ठरते याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साताऱ्यातील २ खासदारांच्या निराळ्या तऱ्हा!

News Desk

अखेर CBI च्या विशेष पथकानं हैदराबादला जाऊन रश्मी शुक्लांचा जबाब नोंदवला

News Desk

“दिवाळीनंतर गोड बातमी देण्याची उर्जामंत्र्यांची घोषणा हवेत विरली”, राजू शेट्टींचा टोला 

News Desk