HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईसह राज्यात कट कारस्थाने शिजत असताना महाराष्ट्र एटीएस झोपलंय का? आशिष शेलारांचा सवाल!

मुंबई। नवरात्र, रामलीला अशा हिंदू सणांमध्ये घातपात करणाच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. जान मोहम्मद शेखला धारावीतून स्पेशल सेलने अटक केली. मुंबईत आणि राज्यात अशी कट कारस्थान सुरु असताना महाराष्ट्र राज्याच दहशातवाद विरोधी पथक (एटीएस) झोपलंय का?, असा संतप्त सवाल भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावामुळे त्यांच अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतय असा आरोपही त्यांनी केला.

ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला

दिल्लीती सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यातील एकजण धारावीतील असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. नॅान कॅाग्निजेबल ऑफेन्समधे केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे राज्याचे पोलिस, पत्रकारांना हात नाही, पाय लावू अशी भाषा करणारे पोलिस, विद्यमान आमदाराला लुक आउट नोटीस काढण्याचा प्रताप करणारे पोलिस दहशतवाद्यांच्या बाबतीत का झोपले होते? हे गृहमंत्री स्पष्ट करतील का? या दहशतवादी प्रकरणाची इंटेलिजन्स माहिती पोलिसांना, गृहमंत्र्यांनी होती तर मग एका विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका असं राजकीय प्रकरण नाही ना? असा सवाल करत पोलिसांच्या इंटेलिजन्स फेल्युअरवर गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

मग अख्ख्या गावाची नोंद करणारा का?

राष्ट्रीय नागरीक नोंदवही ला शिवसेनेचा विरोध आहे. मग परराज्यातील नागरिकांची नोंदवहीचा पुरस्कार कसा करता? असा सवाल करत नौटंकी बंद करुन NRC, CAA बाबत शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. गुन्हेगारीवर बोलण्याऐवजी मुख्यमंत्री विघटनवादी भूमिका घेत आहेत असं सांगत रिक्षाचा वापर झाला म्हणून परराज्यातील लोकांची नोंदवही, उद्या जर एसटीचा वापर झाला तर गावातल्या लोकांची नोंदवही करणार का? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेने राजकीय अस्मितेचा धंदा बंद करुन गुन्हेगारीमुक्त मुंबईकडे लक्ष द्याव असा सल्लाही त्यांनी दिला.

पोलिस सक्षम आहेत, पण राजकीय दबाव

आता सरकार बैठका घेतल असलं तरी झालेल्या अक्षम्य दुर्लक्षावर आता पांघरुण घालता येणार नाही. राजकर्ते पोलिसांच लक्ष नको त्या विषयात घालतात. मग अशा घटना घडतात. आमचे पोलिस सक्षम आहेत. पण राजकीय दबाव, सरकारची गटबाजी, वसुलेबाजी, आणि सौदेबाजी यामुळे ही स्थिती आली असं ही ते म्हणाले. चौकशी अजून वाढवावी आणि गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

अस्मितेचा राजकीय धंदा

यावेळी त्यांनी परप्रांतियांच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर टीका केली. परप्रांतियांची नोंद ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य असंवेनशील असल्याच सांगत प्रत्येक विषयावर अस्मितेचा राजकीय धंदा शिवसेनेने सुरु केला असल्याची टीका त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याला आमचा शंभर टक्के आक्षेप असून गुन्हा आणि पीडितेबाबत असंवेदशीलता दाखवणार हे वक्तव्य आहे. प्रत्येक विषयावर अस्मितेचा राजकीय धंदा शिवसेनेने सुरू केला असून वाढत्या गुन्हेगारीवर बोलण्याऐवजी येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून लोकांच लक्ष वळवण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाहनचालक परवान्यासाठी सुविधा केंद्रावर शुल्क भरण्याची राज्य शासनाने दिली परवानगी

News Desk

‘माकडवस्थेत’ जाऊन झाडावरची पानं – फुलं खाऊन जगावं की काय? रुपाली चाकणकरांचा सवाल

News Desk

अर्ध्या तासात शरद पवारांनी उभारला कोटींचा निधी

News Desk