HW News Marathi
Covid-19

आमचे सरकार नाही, शिवसेनेचे सरकार आहे !

मुंबई | ‘आमचे सरकार नाही, शिवसेनेचे सरकार आहे,’ असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्त्यामुळे राजकीय राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांची कार्यकर्त्यासोबत कथित संभाषणाची ध्वनिफीत सध्या व्हायरल होत आहे.

या ध्वनिफीत पृथ्वीराज चव्हाण आणि एका कार्यकर्त्यामध्ये दूरध्वनीवरील संवाद सुरू आहे. यात स्थानिक कार्यकर्त्यांनी निधीच्या अपेक्षेने पृथ्वीराज चव्हाण यांना फोन केला होता. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “मी मंत्रीमंडळात नाही. पण शिफारस करेन. आमचे सरकार नाही, शिवसेनेचे सरकार आहे. मी शिफारस करेन. पण आर्थिक परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे होईल असा वाटत नाही. निधी सगळा परत घेतला आहे. कोरोनाच्या लढ्यामध्ये निधी सगळा परत घेतला आहे.” कार्यकर्ता म्हणाला, “तुमचे नाव मोठे आहे, तुम्हाला भविष्यात संधी आहे.” “जेव्हा होती संधी, तेव्हा दिली नाही” अशा भावना पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याची ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळते.

संबंधित बातम्या

देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे !

चव्हाणांचे डोके ठिकाणावर आहे का?,अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसलेंची जहरी टीका

“काही समाज विघातक व्यक्तींनी माझ्या सूचनेचा विपर्यास करुन धार्मिक तेढ निर्माण केली”

हे तेच चव्हाण साहेब आहेत, ज्यांनी शिवसेनेबरोबर सरकार स्थापनेचा सुवर्ण विचार मांडला होता

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरणार

News Desk

३० जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही, पण काही अत्यावश्यक सेवा सुरू करणार | मुख्यमंत्री

News Desk

देशात ८६,९६१ नवे रुग्ण तर राज्यात २६,४०८ रुग्णांची कोरोनावर मात

News Desk