Site icon HW News Marathi

“बजेटचा डोंगर, निघाला उंदीर…”,अर्थसंकल्पावर ‘मविआ’च्या आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

मुंबई | राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) हा तिसरा आठवडा आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (15 मार्च) अकरावा दिवस आहे.  सरकारच्या अर्थसंकल्पाविरोधात महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी हात उंदीर आणि डोंगरचे प्रतिकृती घेऊन अर्थसंकल्पाचा निषेध नोंदविला.

दरम्यान,  विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. खोदा पहाड, निकला चुहा… शेतकऱ्यांवर अन्याय करणार्‍या सरकारचा धिक्कार असो… बजेटचा डोंगर, निघाला उंदीर…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजही विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत अर्थसंकल्पावर जोरदार निदर्शने केली.

 

 

 

Exit mobile version