HW News Marathi
महाराष्ट्र

बुरमराहच्या ‘नो बॉल’वर जयपूर पोलिसांची फ्री हिट

मुंबई – नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहनं टाकलेल्या नो बॉलवर पाकिस्तानच्या संघाला मोठी धाव मिळाली नाही. मात्र, या नोबॉलचा आधार घेत जयपूरच्या ट्रॅफिक पोलिसांनी मात्र जोरदार फ्री हिट लगावली आहे. त्यावर बुमराहनंही ट्विट करत पोलिसांना मार्मिक शब्दात सुनावलं.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताची गोलंदाजी सुरू असतांना भारताच्या आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहनं पाकिस्तानचा मॅचविनर फलंदाज फखर झमानला नो बॉल टाकला त्याच बॉलवर तो आऊटही झाला होता. मात्र, पंचांनी नो बॉल घोषित केल्यानं भारताच्या अपेक्षांवर पाणी पडलं. त्यानंतर झमाननं तुफान फलंदाजी केली. बुमराहचा तो नो-बॉल हा या सामन्यात टर्निंग पॉईंट ठरला होता. तोच नो बॉल आता बुमराहची डोकेदुखी ठरू लागलाय.

वाहतूकीच्या नियमांचं पालन करण्यासाठी जयपूरच्या वाहतूक पोलिसांनी बुमराहच्या ‘नो बॉल’चं उदाहरण देणारा फलक चक्क रस्त्याच्या बाजूला लावलाय. या फलकामुळं बुमराह प्रचंड नाराज झालाय आहे. संतप्त बुमराहनं जयपूर पोलिसांनी टविट करत मार्मिक शब्दात सुनावलंय. ‘अतिशय उत्तम जयपूर ट्रॅफिक पोलीस! तुम्ही दाखवून दिलंत की, देशासाठी आपलं सर्वोत्कृष्ट देण्याऱ्या खेळाडूबाबत तुमच्या मनात किती सन्मान आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेसोबत चंद्रकांत पाटील यांची अर्धातास बंद दाराआड चर्चा

News Desk

शरद पवार ममता बॅनर्जी भेटीवर महाविकास आघाडीतील मंत्री म्हणतात….

News Desk

पुण्यात कोरोना बाधितांची संख्या २०४ वर, तर  मृतांचा आकडा २० वर पोहोचला 

News Desk