HW News Marathi
महाराष्ट्र

‘कडक शिस्तीचे प्रशासक’ उपमा देत जयंत पाटलांनी नव्या गृहमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा

मुंबई | माजी विधानसभा अध्यक्ष आणि विद्यमान मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जलसंपदा मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्यासोबतचा युवक कारकिर्दीतील फोटो शेअर करुन अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. दिलीप वळसे पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी जयंत पाटील यांनी एक खास ट्विट दिले आहे.

“माझे जुने मित्र नामदार दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार आज स्वीकारला. कडक शिस्त… कायद्याची सखोल जाण असणारे ते प्रशासक आहेत. ज्या खात्यात काम केले तिथे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे”, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. आता गृहमंत्री या नव्या जबाबदारीसाठीही जयंत पाटील यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“४ महिन्यात ठाकरे सरकारचे ६ मंत्री सीबीआयच्या दारात असतील”, किरीट सोमय्या यांचा दावा!

News Desk

अमरेंद्रसिंहसारख्या प्रभावशाली नेत्याला दूर करणे काँग्रेसची मोठी चूक! – शरद पवार

Aprna

हिंगणघाट जळीत कांडातील पीडित तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी

swarit