HW News Marathi
महाराष्ट्र

…आणि पुन्हा एकदा जयंत पाटील ऑन ग्राऊंड झिरो

सांगली | सांगलीतील इस्लामपूरात एकत्रच कोरोनाचे २५ रुग्ण आढळले आणि अवघ्या महाराष्ट्रात हाहाकार माजला. मात्र सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील हे न डगमगता परिस्थिती हाताळताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर जयंत पाटील यांनी जेथे कोरोना बाधित रुग्ण आढळले त्या इस्लामपूर शहरातील गांधी चौक परिसरात ग्राउंड झिरोवर जाऊन पाहणी केली तसेच परिसराचा आढावा घेतला.

आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांच्या व्यवस्थेत कोणत्याही त्रुटी राहू नये, हाच आमचा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. या भेटीदरम्यान जयंत पाटील यांनी पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन यांच्याकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. नागरिकांनी घाबरून जावू नये, शासनाच्या नियमांचे पालन करावे आणि घरातच रहावे असे आवाहन जनतेला केले.

मागील वर्षी आलेल्या महापुराने पश्चिम महाराष्ट्रात थैमान घातले होते. त्यावेळीही जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी ग्राऊंड झिरोवर जाऊन पूरग्रस्तांची मदत केली होती. आज ज्यापद्धतीने जयंत पाटील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या जनतेची काळजी घेत आहेत त्यानिमित्ताने पुन्हा एकदा अनेकांना महापुरातील दृश्यांची आठवण झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कात्रजमधील परिस्थितीला पालिका जबाबदार – सुप्रिया सुळे

News Desk

नारायण राणेंवर गुन्हा दाखल! मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपशब्द बोलण्याने गुन्हा दाखल

News Desk

#Vidhansabha2019 : पुण्याच्या ८ ही जागा भाजपकडे

News Desk