HW News Marathi
महाराष्ट्र

जयसिंह मोहीते पाटलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

पंढरपूर | महाराष्ट्रात सगळीकडेच जिल्हा परिषदेच्या निवडणूका धुरळा सुरु आहे. सोलापुरात झालेल्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातील सहा सदस्यांवर भाजपाला मतदान केल्याच्या आरोपावरुन निलंबनाची कारवाई केली होती. पण या निलंबनानंतर मोहिते पाटील आक्गरमक झाले. ‘आधी अजित पवारांवर कारवाई करा, मगच आमच्या सदस्यांचं निलंबन करा’, असं म्हणत जयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जयसिंह मोहिते पाटील यांच्या गटातील सहा सदस्यांनी भाजपला मतदान केलं होतं त्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली होती. स्वरुपाराणी मोहिते पाटील, शितल देवी मोहिते-पाटील, सुनंदा फुले, अरुण तोडकर, गणेश पाटील आणि मंगल वाघमोडे अशी कारवाई करण्यात आलेल्या सदस्यांची नावे होती.

‘राज्याच्या सत्ताकारणात पक्षविरोधी भूमिका घेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली? अडीच वर्षांपूर्वी संजय शिंदे भाजपकडून जिल्हा परिषद अध्यक्ष झाले त्यावेळी कोणती कारवाई केली? यासोबतच दिपक साळुंखे यांचा पराभव करणाऱ्या राष्ट्रवादीच्या सदस्यांवर कारवाई झाली का?’ असे प्रश्नही जयसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शालेय शिक्षण विभागामार्फत ‘महाराष्ट्र यंग लिडर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’! – प्रा.वर्षा गायकवाड

Aprna

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्ज आज होणार सुनावणी

Aprna

वृक्ष लागवड योजनेच्या यशासाठी १८ महिन्यांची रोपं द्या – सरपंच संघटनेची मागणी   

News Desk