HW News Marathi
महाराष्ट्र

रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी; भाजपच्या आयटी सेलचे महाराष्ट्र प्रभारीला मुंबई सायबर सेलने घेतले ताब्यात

मुंबई | भाजपच्या आयटी सेलचे महाराष्ट्र प्रभारी जितेन गजारिया यांना सायबर सेल पोलिसांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. सायबर पोलीस सेलच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांच्याकडून गजारियांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पंरतु शिवसेनात त्यांच्या सत्तेचा सत्ता दुरुपयोग करत असून भाजपचे नेत्यांनी गजारियांच्या ट्वीटचे समर्थन केले सायबर सेलच्या भाजपचे नेत्यांनी गजारियांच्या ट्वीटचे समर्थन केली. 

गजारिया यांच्या वकिलांनी म्हटले, “रश्मी ठाकरेंना ‘राबडीदेवी’ म्हटले, तर त्यात ऐवढे काय झाले? राबडीदेवी या बिहारच्या मुख्यमंत्री होत्या. मग रश्मी ठाकरेंना राबडीदेवी म्हणण्यात काय चूक आहे,” असा सवाल त्यांनी गजारियांच्या वकिलांनी उपस्थित केले. तसेच पुढे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत म्हणून कोणी ट्विट करू शकत नाही, असा कोणताही कायदा नाही. गजारिया यांनी केलेल ट्विट हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्याच्या चौकटीत राहून केले असून ठाकरे सरकार पोलिसांवर दबाव टाकत आहे. त्यांनी केलेल ट्वीट हे सभ्य भाषेतील असून त्यात कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह भाषेचा त्यांनी वापर केलेला नाही. येथून पुढे सभ्य भाषेतून राजकीय ट्वीट करण्यात येईल,” असे ते म्हणाले.

नेमका वाद काय?

जितेन गजारिया हे भाजपच्या आयटी सेलचे महाराष्ट्र प्रभारी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविषयी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांना ‘मराठी राबडीदेवी’, असे म्हटले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणे यांचं जामिना नंतर पहिलं ट्विट! म्हणाले…..

News Desk

भाजपच ठरला ‘मोठा भाऊ’ शिवसेनेनेही केले मान्य

News Desk

राहुल कलाटे चिंचवड पोटनिवडणूक लढवणार; ‘मविआ’च्या प्रयत्नांना अपयश

Aprna