HW News Marathi
महाराष्ट्र

अर्णब गोस्वामींना कोठडी होण्यासाठी पोलिसांनी कोर्टात मांडले युक्तीवाद

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना आज (४ नोव्हेंबर) इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. २०१८ साली अन्वय नाईक यांनी यांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. ज्यात त्यांनी त्यांच्या आत्महत्येस कारण म्हणून ३ जणांची नावे लिहिली होती. या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीसांनी काही युक्तीवाद केले आहेत ते पुढीलप्रमाणे-

पोलीसांच्या वकिलांचे युक्तीवाद –

अर्णब गोस्वामी एका प्रस्थापित न्यूज चॅनलचे संपादक असून त्यांचा सामान्यांवर प्रभाव आहे.

अन्वय नाईक यांची स्युसाईड नोट मृत्यूपूर्वीची जबानी म्हणून ग्राह्य धरण्यात आली आहे. आरोपींच्या कंपन्यांच्या मालकी/भागिदारीची कागदपत्र प्राप्त करून घ्यायची आहेत.

नाईक यांच्या कंपनीतील साक्षीदारांचा तपास करायचा आहे. त्यावेळी अर्णव पोलीस कोठडीत असणे गरजेचं आहे. नाहीतर साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो.

या गुन्ह्यांत नव्याने तपासामध्ये सकारात्मक माहिती मिळाली आहे. त्याचा तपास करायचा आहे.

यापूर्वी केलेल्या तपासात कोणत्या वेंडर्सकडून कामं आरोपींनी पूर्वा करून घेतली याची माहिती नाही. त्यामुळे या वेंडर्सचा तपास करायचा आहे. त्यांना अटक करायची आहे.

काम केल्याची कागदपत्र जप्त करायची आहेत.

वर्क ऑर्डरपेक्षा जास्त काम केल्याचं साक्षीदीरांचं म्हणणं आहे. याचा तपास करायचा आहे.

अन्वय नाईक यांनी वेळेत काम पूर्ण केले नाही, असा आरोपींचा दावा आहे. त्याची कागदपत्र जप्त करायची आहेत.

नवीन तपासात काही कंपन्यांचे बॅंक अकाउंट नंबर मिळाले आहेत. त्यात आणखी काही अकाउंट आहे का, याची माहिती गोळा करायची आहे.

काही साक्षीदारांचे 164 CRPC अंतर्गत जबाब नोंदवायचे आहेत. त्यासाठी गोस्वामी यांना पोलीस कोठडी गरजेची आहे.

आरोपींकडून सादर करण्यात आलेली कागदपत्र बनावट आहेत का, याचा तपास बाकी आहे.

आरोपींनी सादर केलेल्या डेबिट नोटवर मयत यांची किंवा त्यांच्या कंपनीची सही असल्याचा पुरावा नाही. त्यामुळे या एकतर्फी जारी करण्यात आल्या आहेत. याचा तपास पोलीस कोठडीत करायचा आहे.

रायगड पोलिसांनी या प्रकरणी 15 ऑक्टोबरपासून नव्याने तपास सुरू केला आहे. त्यात त्यांनी फिर्यादी अक्षता नाईक यांचा जबाब नोंदवला आहे. तसंच नाईक यांच्या कंपनीचा महत्त्वाचा वेंडर असलेल्या व्यक्तिचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २८ साक्षीदारांना तपासासाठी नोटीस पाठवली आहे. यापूर्वी केलेल्या तपासातील काही साक्षीदारांनीही नवी माहिती दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.

त्यांच्याकडून मिळालेली माहिती सकारात्मक असल्याचं पोलिसांचं म्हणण आहे.

नाईक यांच्या लॅपटॉपमधील फाईल्सची तपासणी सुरू असून त्यात १ लाख पेक्षा जास्त फाईल्स असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच त्यांच्या आणि आरोपींच्या बॅंक खात्यांचीही चौकशी सुरू आहे.

अन्वय नाईक प्रकरण काय आहे?

५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली. तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता.अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते.

अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरलं होतं, असा आरोप अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी केला आहे.त्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीनं अलिबाग पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे.

रायगडमधील अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही कुठलीच कारवाई होत नसल्याने, नंतर 5 मे 2020 रोजी म्हणजे अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला दोन वर्षं झाल्यानंतर अक्षता नाईक यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला आणि न्यायाची मागणी केली. त्यावेळी काँग्रेससह विविध पक्षांनी हा मुद्दा उचलला आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाईची मागणी केली.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या व्हीडिओची आणि अक्षता नाईक यांच्या तक्रारीची दखल घेत, 26 मे 2020 रोजी सांगितलं की, “आज्ञा नाईक (अन्वय नाईक आणि अक्षता नाईक यांची मुलगी) यांनी अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिकनं पैसे थकवल्यानं वडील आणि आजीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची रायगड पोलीस तपास करत नाहीत अशी तक्रार केली. त्यानंतर मी सीआयडीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.”

“अक्षता नाईक या सत्याला तोडून-मोडून मांडत आहेत. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेडशी (अन्वय नाईक यांची कंपनी) असलेला सर्व व्यवहार पूर्ण करण्यात आला असून, त्याचे कागदपत्रही आमच्याकडे आहेत,” असं अर्णब गोस्वामींच्या टीमने म्हटलं आहे.

तसंच, “अक्षता नाईक यांना त्यांनी केलेल्या आरोपांचे कुठलेच पुरावे पोलिसांसमोर सादर करता आले नाही. त्यामुळे हे प्रकरण बंद झाले आहे. कुठलेही अवैध कृत्य झाले, याचे त्यांच्याकडे पुरावे नाहीत.

“अक्षता नाईक यांनी सत्या चुकीच्या पद्धतीने मांडल्यास, चुकीचे दावे केल्यास किंवा ARG आऊटलायर मीडियाला लक्ष्य केल्यास बदनामी केल्याप्रकराणी कायदेशीर कारवाई करू,” असा इशाराही अर्णब गोस्वामींनी दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेड-हैद्राबाद विमानसेवेचा २७ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ

News Desk

‘केंद्रातील जुलमी, अत्याचारी भाजपा सरकारविरोधात पेटून उठा’, नाना पटोलेंचं आवाहन!

News Desk

कृषी विधेयक संमत होताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून का बसले ? मनसेचा सवाल

News Desk