Site icon HW News Marathi

महाराष्ट्रातील गाड्यांवर कर्नाटकच्या ‘या’ संघटनांकडून तोडफोड; सीमावाद चिघळण्याची शक्यता

मुंबई | पुण्याहून बंगळुरूकडे जाणाऱ्या गाड्यांवर कन्नड रक्षण वेदिके (Kannada Rakshana Vedike )या संघटनेने हल्ला केला आहे. या संघटनेने बेळगावच्या (Belgaum) हिरेबागेवाडी टोल नाक्यावर हल्ला केला आहे. या संघटने जवळपास 6 गाड्यांपेक्षा जास्त गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे. या संघटनेचे नारायण गौडा हे आज (6 डिसेंबर) बेळगाव दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान गौडांच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये रस्ता रोको करत आंदोलन करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद maharashtra-karnataka border dispute) पेटला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र सरकार काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी बेळगावच्या हिरबागेवाडी टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेंनी तोडफोड केल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. आणि पोलिसांनी नारायण गौडांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. कन्नड संघनटांनी लाल पिवळे झेंडे फडकून महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांविरोधात करत आंदोलन केली. सीमावादावरून कन्नड रक्षण वेदिकेने महाराष्ट्राला डिवचण्याचे काम केले आहे. या संघटनांकडून शहात अजून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सांगलीतील जत तालुक्यातील 40 गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव समंत केला होता, यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे गांभीऱ्यांनी विचार करणार असल्याचे माध्यमांसोबत त्यांनी सांगितले होते. हा वाद ताजा असतानाच कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूरतील अक्कलकोटवर दावा केला होता.

Exit mobile version