HW News Marathi
महाराष्ट्र

“आता राज्यातील सर्व गुन्ह्यांची उकल ‘NIA’ने करावी का?”; भाजपचा सरकारला सवाल

मुंबई | अणुबॉम्बसाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यंत ज्वलनशील अशा युरेनियमचा मोठा साठा अलीकडेच मुंबईत जप्त करण्यात आला होता. याप्रकरणात दोन जणांना दहशतवादविरोधी पथकाने अटक केली होती. मात्र, यानंतर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA कडे देण्यात आला आहे. यावरून आता ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा टीका करण्यात आली असून, राज्यातील सर्व गुन्ह्यांची उकल ‘एनआयए’ने करावी काय, अशी विचारणा करण्यात आली आहे.

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्विट करून या प्रकरणी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारच्या थंड कारभाराचा आणखी एक नमुना. मुंबईत सापडलेल्या युरेनियम प्रकरणात तब्बल तीन महिन्यांचा वेळकाढूपणा झाल्यानंतर अखेर तपास एनआयएने ताब्यात घेतला. राज्यातील साऱ्या गुन्ह्यांची उकल एनआयएने करावी काय.. राज्य सरकारच्या तपास यंत्रणांवर कोणाचे दडपण आहे?, असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे.

काय म्हणाले आहेत केशव उपाध्ये?

राज्य सरकारच्या थंड कारभाराचा आणखी एक नमुना. मुंबईत सापडलेल्या युरेनियम प्रकरणात तब्बल तीन महिन्यांचा वेळकाढूपणा झाल्यानंतर अखेर तपास एनआयएने ताब्यात घेतला. राज्यातील साऱ्या गुन्ह्यांची उकल एनआयएने करावी काय.. राज्य सरकारच्या तपास यंत्रणांवर कोणाचे दडपण आहे?

 

राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणातील दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. जिगर पांड्या आणि अबू ताहीर अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी ७ किलो १०० ग्रॅम युरेनियमचा साठा मानखुर्दमधल्या एका कारखान्यात लपवून ठेवला होता. हे दोघेही गेल्या वर्षभरापासून हा साठा विकण्यासाठी गुप्तपणे ग्राहक शोधत होते, अशी माहिती मिळाली आहे. या आरोपींना १२ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“दर महिन्याला त्यांच्या पदरामध्ये वेळेत ते वेतन पडलं पाहिजे”, शरद पवारांचा “तो” व्हिडिओ व्हायरल

News Desk

महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची दिली धमकी

News Desk

‘परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे’, निलेश राणेंचा प्रहार  

News Desk