HW News Marathi
क्राइम

दाऊदला आणलंत तरी घाबरणार नाही, किरीट सोमय्या यांचं आवाहन

मुंबई | माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज ठाण्यात अनेक गौप्यस्फोट केले. शिवसेनेचे लोक मला गोळ्या घालण्याच्या धमक्या देत असून त्यावर मुंबई पोलीस काहीच कारवाई करत नाहीत असा थेट आरोप त्यांनी केला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डनच्या 114 फ्लॅटला OC मिळाली नाही, स्वतः भूषण गगराणी यांनी हे सगळे अनधिकृत बांधकाम असून त्याला अधिकृत करता येणार नाही असं म्हटलं, त्यामुळे प्रताप सरनाईक यांची सर्व मालमत्ता विकून ठाणे महानगरपालिकेने थकबाकी वसूल करावी अशी मागणी त्यांनी केली.

भावना गवळी त्यांच्या बाबतीत मोठा खुलासा

तुम्ही कितीही मोठे गुंड आणलात, अगदी दाऊद इब्राहिमला आणलं तरीही आपण घोटाळ्याबाबत खुलासे करत राहणारच असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट ठाकरे सरकारलाच खुलं आव्हान दिलं आहे.आपण ज्या बारा मंत्र्यांची नावे दिले आहेत ते सर्व गुन्हेगार असून शरद पवार त्यांना पाठीशी घालत आहेत तर भावना गवळी त्यांच्या बाबतीत मोठा खुलासा आपण पुण्यातील पत्रकार परिषदेत उद्या करणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.

किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ठाकरे सरकारमधील नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराची मोहिम सुरु केल्यानं आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. याबाबत सोमय्या यांनी केंद्राकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती.महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे भ्रष्ट सरकार असून तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडून कोट्यावधी रुपये घेतल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा, सचिन वाझे आणि इतरांना याआधीच पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतरही आरोपी लवकरच पोलिसांच्या हाती लागतील आणि मनसूख हिरेन यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सलमान खाननी ‘या’ कारणासाठी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

Aprna

जेल प्रशासनाकडून कायदेशीर कारण सांगत आर्यनच्या सुटकेस नकार

News Desk

आमदार बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी; मुंबईच्या गिरगाव न्यायालयाचा निर्णय

Aprna