HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या महापौर म्हणाल्या एकत्र राहू, कॉंग्रेस म्हणतं…

मुंबई | काँग्रेस सध्या स्वबळाचे नारे लावत आहेत. महाविकासआघाडी पक्षांमध्ये कुरघोडी सुरु असल्याचं चित्र दिसून येतंय. “मुंबई आणि महाराष्ट्रसाठी चांगलं काम करणाऱ्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे”, असं म्हणत महापौर किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसला सोबत राहण्याचं आवाहन केलं. मात्र आम्ही स्वबळावरच लढणार, असं काँग्रेसने ठणकावून सांगितलं. मुंबई मनपातील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ही प्रतिक्रिया दिली.

महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढवू

महाविकासआघाडी मध्ये सतत सुरु असलेल्या कुरघोड्यांमुळे महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असं दिसून येतंय. विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या कार्यक्रमाला महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप एकत्र होते. शिवसेना आणि काँग्रेसचे महापालिकेतील नेते एकत्र, एकाच मंचावर आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जरी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा काँग्रेसने वारंवार केली आहे.

महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज

राज्यात शिवसेना आणि काँग्रेस सत्तेत एकत्र असले तरी मुंबई महापालिकेत मात्र या दोन्ही पक्षात विस्तवही जात नाही. संधी मिळताच महापालिकेत शिवसेनेला अडचणीत आणायचं असं धोरण काँग्रेसने घेतलेलं दिसतंय. काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिकेची नालेसफाईची आकडेवारी खोटी असल्याचा दावा केला होता. महापालिकेच्या नालेसफाईच्या या आकडेवारीचा पर्दाफाश करणार असल्याचंही रवी राजा यांनी स्पष्ट केलं होतं. मुंबई महापालिकेने मुंबई शहरात १०२ टक्के, पूर्व उपनगरात ९३ टक्के तर पश्चिम उपनगर ९६ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. त्यावर रवी राजा यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आजपासून प्लास्टिक बंदी, कारवाईला सुरुवात

News Desk

या माणसाला शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही तो माणूस… राणेंचा पवारांवर निशाणा

News Desk

“… म्हणून मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला”, कारण सांगताना माजी आमदाराच्या डोळ्यात पाणी

News Desk