HW News Marathi
महाराष्ट्र

जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीचे वर्चस्व, राज्यासह जिल्ह्यात भाजपची पीछेहाट

कोल्हापूर | महाविकासआघाडीने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निकालात भाजपला जोरदार धक्का देत सत्ता काबीज केली आहे. आणि भाजपची जिल्हा परिषदेवरील सत्ता हद्दपार केली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघही भाजपकडे नसून शहरातील महानगर पालिका देखील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांना ४१ तर राहुल आवाडे यांना २४ मते मिळाली. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीचा झेंडा फडकविला आहे. यात सतेज पाटील यांची भूमिका महत्वाची मानली जात आहे. कोल्हापूरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मोठा पराभव झाल्याचे मानले जाते.

मागील अडीच वर्षांपासून कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजप सत्तेवर होते. मात्र, आता महाविकासआघाडीने राज्यासह जिल्हा परिषद देखील आपल्या नावी केली आहे. महाविकास आघाडीमुळे भाजपला सत्तेपासून दूर राहवे लागले आहे. भाजपच्या अरुण इंगवले यांचा पराभव झाला असून काँग्रेसचे बजरंग पाटील कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष झाले आहेत. तर, नाशिक जिल्हापरिषदेवर भगवा फडकल असून आघाडीच्या पाठिंब्याने सेनेच्या बाळासाहेब क्षीरसागरांची बिनविरोध निवड झाली आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल

काँग्रेस आघाडी

कॉग्रेस – १४

राष्ट्रवादी – १०

शिवसेना -१ ०

शेतकरी संघटना – ०२

शाहू आघाडी – ०२

अपक्ष – ०१

चंदगड विकास आघाडी- ०१

ताराराणी आघाडी – ०१

एकूण- ४१

भाजप आघाडी

भाजप-१३

आवाडे गट – ०२

चंदगड युवक क्रांती आघाडी- ०१

जनसुराज्य – ०६

ताराराणी आघाडी ०२

एकूण- २४

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार, नवाब मलिकांचा इशारा

News Desk

बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा राजीनामा

News Desk

आघाडीच्या नावात ज्याचं ‘शिव’हरवलं त्यांनी एनडीएमध्ये राम उरलाय का याची चर्चा करणं हास्यास्पद!

News Desk