HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

कोल्हापूर। कोल्हापूर मधून अतिशय दुःखद बातमी आता समोर आली आहे. काँग्रेसचे राजीव सातव यांचे निधन झाल्यानंतर आता काँग्रेसवर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोल्हापूरमधील काँग्रेस आमदाराचं निधन झाल्याची दुःखद बातमी आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झालं. हैदराबाद येथे हृदयविकाराच्या धक्क्याने चंद्रकांत जाधव यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

कोल्हापूरकरांमध्ये हळहळ व्यक्त

गेल्या काही दिवसांपासून हैदराबादमध्ये चंद्रकांत जाधव यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणले जाणार असल्याची माहिती जाधव यांच्या निकटवर्तीयांनी दिली. चंद्रकांत जाधव यांच्या अचानक जाण्याने आता सर्वत्र कोल्हापूरकरांमध्ये हळहळ व्यक्त होतेय.

चंद्रकांत जाधव कोण?

जाधव हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे दोन वेळ आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला होता.राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा मोठा वाटा आहे.

शांत आणि संयमी आमदार

2019 मध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात चंद्रकांत जाधव उतरले, काँग्रेसच्या तिकिटावर जाधवांनी निवडणूक लढवली होती. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशीही जाधव यांचे घनिष्ठ संबंध होते. चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी कोल्हापूर महानगर पालिकेत भाजपच्या नगरसेविका म्हणून होत्या कार्यरत आहेत. शांत आणि संयमी आमदार म्हणून त्यांची संपूर्ण कोल्हापुरात ख्याती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतसिंग प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल !

News Desk

महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक विधानसभेत मंजूर

Aprna

लोकांना गांधी कुटुंबच नेतृत्व करु शकतं असं वाटत असेल तर तो पक्षाचा निर्णय – संजय राऊत

News Desk