Site icon HW News Marathi

आजपासून कोल्हापूर-मुंबई विमान सेवा सुरू

मुंबई | कोल्हापूर-मुंबई विमान सेवेची (Kolhapur Mumbai Airliance) आजपासून सुरू झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कोल्हापूर-मुंबई विमान सेवेच्या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थितीत राहणार आहेत. कोल्हापूर-मुंबई विमान सेवा ही संजय घोडावत यांच्या ‘स्टार एअरवेज’ कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. ही विमान सेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार  आठवड्यातून तीन दिवस असणार आहे. हे विमान आज (4 ऑक्टोबर) 10.30 वाजता उड्डाण करणार आणि हे विमान कोल्हापूरमध्ये 11.20 मिनिटांत पोहोचणार आहे.

मुंबई-कोल्हापूरमधील विमान प्रवास हा 40 मिनिटाचा असणार आहे. तर हे विमान कोल्हापूरातून सकाळी 11.50 वाजता उड्डाण करून मुंबईत 12.45 वाजता पोहोचणार आहे. कोल्हापूर-मुंबईमध्ये विमान सुरू व्हावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रवासी करत होती. अखेर आज कोल्हापूर-मुंबई विमान सेवा सुरू होणार आहे. कोल्हापूर-मुंबई विमान सेवेचे तिकीट दर 2 हजार 573 रुपये इतका तिकीट दर आहे.

दरम्यान, कोल्हापूर-मुंबई विमानसेवा कोरोना काळात बंद करण्यात आली होती. पुन्हा एकदा कोल्हापूर-मुंबई सेवा करण्याची मागणी प्रवासी करत होते. अखेर प्रवाशांच्या मागणीला यश आले आणि आजपासून कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे.

 

 

Exit mobile version