Site icon HW News Marathi

भगतसिंग कोश्यारींना नौदलातर्फे मानवंदना; नव्या राज्यपालांचा उद्या होणार शपथविधी

मुंबई | मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना आज भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

 

विमानतळाकडे प्रस्थान करण्यापूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवारी (18 फेब्रुवारी) दुपारी १२.४० वाजता राजभवन येथे शपथ घेणार आहेत. आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात मंत्रिमपद देखील सांभाळले होते. तसेच महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी निुयक्ती होण्याआधी त्यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे.

रमेश बैस यांचा अल्प परिचय

रमेश बैस यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ रोजी छत्तीसगढच्या रायपूरमध्ये झाला होता. रमेश बैस यांनी सर्वप्रथम १९७८ मध्ये नगरपालिकेत निवडून आले होते. १९८० ते ८४ मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. तसेच छत्तीसगढमधील रायपूर येथील लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. रमेश बैस हे मध्य प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष पद देखील सांभाळले असून वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि वन राज्यमंत्री पद देखील भूषविले आहे. २०१९ मध्ये रमेश बैस यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम केले होते. रमेश बैस हे सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत.

Exit mobile version