HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ला प्रकरणी, गुणरत्न सदावर्तेंसह 115 ST कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मिळाला आहे. सदावर्तेंसह ११५ एसटी कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आज (२२ एप्रिल) सदावर्तेंना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाने १० हजार रुपयाच्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

सकल मराठा क्रांती मोर्चाचे कोल्हापुरमधील समन्वयक दिलीप पाटील यांनी सदावर्तेंविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून गुरुवारी (२१ एप्रिल) सदारवर्तेंना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदावर्ते हे २५ एप्रिलपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.  सदावर्तेंनी विविध मार्गाने पैसे जमवून ते मराठा आरक्षणविरोधी न्यायालयीन प्रक्रियेसाठी खर्च केले असून त्यांचा हिशेब न दिल्याचा आरोप पाटलांनी केला आहे. सदावर्तेंनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय याचिका दाखल केली.

सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाकडून सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने सदावर्तेंना सोमवारी (१८ एप्रिल)  १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सुनावणी झाली. सदावर्तेंनी एका टिव्ही न्यूज चॅनला दिलेल्या मुलाखतीत सदावर्तेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. सदावर्तेंच्या वक्तव्यावर राज्यभरात विरोध दर्शविला होता. या वक्तव्यविरोधात साताऱ्यात राजेंद्र निकम यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले आहे. या प्रकरणी सदावर्तेंविरोधात २०२० मध्ये गुन्हा दाखल झाला होता.

नेमके काय आहे प्रकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास एसटी कर्माचाऱ्यांनी हल्ला केला होता. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थाना बाहेर चप्पल भरकावल्या  होत्या. तेव्हा कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी दिल्या होत्या. एका तासानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास यश मिळाले.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘बेस्ट’ला आर्थिक बळकटी देण्यासाठी तिकीट स्वस्त

News Desk

चक्क विधानपरिषदेत रंगली भडंग, वडा आणि माश्यांची चर्चा…..

Ruchita Chowdhary

शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या आमदारकीचा दिला राजीनामा

News Desk