HW News Marathi
महाराष्ट्र

गुणरत्न सदावर्ते गिरगाव न्यायालयात हजर, ताब्यासंदर्भात सुनावणी सुरू

मुंबई | वकील गुणरत्न सदावर्तेंना मुंबईच्या गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सदावर्तेंना ताब्यात घेण्यासंदर्भात न्यायालयात आज (२० एप्रिल) सुनावणी सुरू आहे. गिरगाव कोल्हापूर आणि अकोट पोलीस मागणार आहेत. यामुळे आता सदावर्तेंचा ताबा कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याआधी सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी १८ एप्रिल रोजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.सदावर्तेंनी एका टिव्ही न्यूज चॅनला दिलेल्या मुलाखतीत सदावर्तेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. सदावर्तेंच्या वक्तव्यावर राज्यभरात विरोध दर्शविला होता. या वक्तव्यविरोधात साताऱ्यात राजेंद्र निकम यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले आहे. या प्रकरणी सदावर्तेंविरोधात २०२० मध्ये गुन्हा दाखल झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवसस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. या प्रकरणी सदावर्तेंना गिरगाव न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हे प्रकरण सुरु असतानाच सदावर्तेंना सातारा पोलिसांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सातारामध्ये सदावर्तेंवर दीड वर्षापूर्वी दाखल झालेल्या प्रकरणी त्यांना मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगातून १४ एप्रिल रोजी ताब्यात घेतले आहे. यानंतर पोलीस साताऱ्यात घेऊन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशमुखांची चौकशी करणं राज्य सरकारनं हेतूपूर्वक टाळलं ?

News Desk

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावले!

News Desk

आता मध्य आणि पश्चिम रेल्वेने थकवले पाण्याचे २३३ कोटींच बिल

News Desk