HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीसांनी स्वत: ट्वीट करत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. फडणवीस हे सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर उपचार सुरू आहे.  त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घेणयाचा सल्ला फडणवीसांनी ट्वीट करत दिला आहे.  ताप आल्याने  फडणवीसांनी लातूर ते सोलापूर दौरा अर्धवट सोडला होता. 

फडणवीसांचा सोलापूर दौरा हा आगामी राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचा होता. या भेटीदरम्यान फडणवीसांना दोन अपक्ष आमदारांचे मत भाजपच्या बाजूनने वळवण्याचा प्रयत्न करणार होते. परंतु, फडणवीस काल (४ जून) ताप आल्यामुळे कोरोना चाणणी केली. यानंतर कोरोनाचा अहवाल लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी हा दौरा रद्द केला. सध्या देशासह राज्यात कोरोना पुन्हा डोकेवर काढत आहे. देशात गेल्या २४ तासात ३ हजार ९६२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगाना आणि कर्नाटकमध्ये दररोज कोरोना रुग्णांच्या संख्ये वाढ होत आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

थातूरमातूर बोलून विषय टोलवू नका, राम कदमांचे राऊतांना आव्हान 

News Desk

“हम करे सो कायदा”, अशीच फडणवीसांची प्रवृत्ती, खडसेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल

News Desk

‘भाजपवाल्यांचा कोणत्या अभिनेत्रींशी संबंध आहे हे उघड करायला आम्हाला आव्हान देऊ नये’ – मलिक

Manasi Devkar