HW News Marathi
महाराष्ट्र

‘ठाकरे सरकारचे नेते एकमेकांची पाठ खाजवतात’अमृता फडणवीसांची टिका!

पुणे। हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी अप्रतिम घडवलेल्या वस्तूंच्या महोत्सवाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन पुण्यात पार पडलं. यावेळी अमृता फडणवीस यांनी एचडब्ल्यू मराठीशी संवाद साध्या . पुण्याच्या निर्बंधाबाबत बोलताना त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला. 4 टक्के पॉझिटिव्हिटी रेट असताना पुण्यात मुंबईसारखी सुट का नाही हे कळत नाही, असं त्या म्हणाल्या.

‘महाविकासआघाडीत एकमेकांची चांगली पाठ खाजवतात’

महाविकास आघाडीवर विरोधी पक्ष सातत्याने टीका करत असतात.तर अशी कुठली एखादी गोष्ट आहे का महाविकास आघाडी सरकारची जी तुम्हाला आवडते ? या प्रश्नावर उत्तर देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणाल्या की,महाविकासआघाडीतले हे लोक खूप चांगल्या प्रकारे एकमेकांची पाठ खाजवतात.एकमेकांपुढे उभे राहतात, एकमेकांना वाचवतात ही चांगली गोष्ट आहे.असं अमृता फडणवीस पुण्यात एच डब्लू न्यूज मराठीशी बोलतांना म्हणाल्या. हातमागाविषयी

अमृता फडणवीस काय म्हणाल्या ?

“हॅन्डलूम जगभरात आहे. हॅन्डलूम 125 देशात एक्स्पोर्ट होतं. शेती नंतर हातमाग हा सर्वात मोठा उद्योग आहे. 77 टक्के या कामात स्त्रिया आहेत. 7 ऑगस्ट 2015 पासून हातमागदिन साजरा केला जातो.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातमागाचं महत्व ओळखले आहे. स्वदेशी चळवळ 7 ऑगस्टला सुरु झाली होती. त्याचमुळे 7 ऑगस्ट ला हातमागदिन साजरा केला जातो. पैठणीचं कारोबारही मोठा आहे. देशातले स्त्रिया पैठणी ऐटीने घालतात. हॅन्डलूमचं क्षेत्रही चांगलं वाढत आहे. हँडलूमच्या वस्तू फक्त जपून ठेवायच्या नाहीत त्या वापरायच्या.”, अस अमृता फडणवीस उद्घाटन कार्यक्रमानंतर म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, छगन भुजबळ यांची माहिती!

News Desk

नवाब मलिकांचा ‘त्या’ भाजप नेत्याच्या मेहुण्याबाबतचा गौप्यस्फोट

News Desk

‘येड्याची जत्रा आणि खुळ्यांची चावडी’, गोपीचंद पडळकरांचा विजय वडेट्टीवारांवर हल्ला

News Desk