HW News Marathi
महाराष्ट्र

महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम होत आहे. परंतु, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार सर्व क्षेत्रातील उद्योजकांना, शेतकऱ्यांना कसा लाभ होईल यानुसारच पावले उचलत आहेत. काल (३१ मार्च) दुध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी दिलासा दिला. सरकार २५ रुपये प्रतिलिटर दुधाची खरेदी करणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

दरम्यान, आज (१ एप्रिल) महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत राज्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी रक्कम जमा करण्यात आली आहे. त्याबद्दलचे ट्विटही त्यांनी केले आहे. जिल्हा सहकारी बॅंकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली असल्याचेही त्यांनी ट्विटरवरुन सांगितले आहे.

घरातच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चक्क विधानपरिषदेत रंगली भडंग, वडा आणि माश्यांची चर्चा…..

Ruchita Chowdhary

अखेर MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार

Aprna

कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांचा मृत्यू

Aprna