HW News Marathi
महाराष्ट्र

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा आज घेणार राज्यपालांची भेट

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे शिवसैनिकांकडून मारहाण झालेले माजी नौदल अधिकारी मदन शर्मा आज (१५ सप्टेंबर)राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी १२ वाजता ते राजभवनावर जाऊन भेट घेणार आहेत. तसेच, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांनीही शर्मा यांची भेट घेतली होती.

मदन शर्मा हे निवृत्त सैनिक असल्यामुळे त्यांना करण्यात आलेल्या मारहाणीचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावरही चांगलाच गाजला होता. भाजप पक्षाकडून आणि इतर अनेक स्तरांतून याप्रकरणी कठोर कारवाई व्हावी, ही मागणी केली जात होती. याशिवाय, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. त्यांनी दुरध्वनीवरून मदन शर्मा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. माजी सैनिकाला अशाप्रकारे मारहाण होणे, खेदजनक असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच भविष्यात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे या भेटीत काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री कंगना हिने राज्यपालांची भेट घेतली होती. शिवसेनेसोबतच्या वादानंतर मुंबई महानगरपालिकेने कंगना हिच्या पाली हिल येथील अनधिकृत कार्यालयावर कारवाई केली होती. याविरोधात दाद मागण्यासाठी कंगना राणौत राज्यपालांना भेटली होती. यावेळी तिने आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी राज्यपालांकडे केली होती. जेणेकरून देशातील नागरिकांचा विशेषत: तरुण मुलींचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वृद्धिंगत होईल, असे कंगनाने म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोना विरोधात’ – उद्धव ठाकरे

News Desk

काँग्रेसला लाॅटरी लागली पण तिकीटच कोणी फाडत नाही ! सुजय विखेंचा टोला ….

News Desk

जिजाऊ माँसाहेबांच्या स्वाभिमानी विचारांवरच महाराष्ट्राची वाटचाल राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक वंदन

News Desk