HW News Marathi
महाराष्ट्र

ज्येष्ठ गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचं निधन

सिंधुदुर्ग। सुरेश भट्टांचा वारसा चालवणारे व महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गझलकार, पत्रकार मधुसूदन नानिवडेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील तळेरे येथे निधन झाले. वाशी येथे झालेल्या ९ व्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्यावर मूळ गावी नानिवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नानिवडेकर यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

कोण होते मधुसूदन नानिवडेकर ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नानिवडे येथील मधुसूदन नानिवडेकर महाराष्ट्रात गझलकार म्हणून परिचित होते. त्यांच्या अनेक गझला गझलनवाज भीमराव पांचाळे आपल्या कार्यक्रमातून सादर करतात. नानिवडेकर यांच्या अनेक गझलांनी महाराष्ट्राला वेड लावले. चांदणे नदीपात्रात हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला असून त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. या काव्य संग्रहाची निवड पुणे विद्यापीठात संदर्भ ग्रंथ म्हणून झाली आहे. तर पत्रकारितेसाठीही अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. संपुर्ण राज्यभर त्यांनी गझल लेखनाच्या अनेक कार्यशाळा घेतल्या.

संपुर्ण महाराष्ट्रात गझल कार्यक्रमात टाळ्यांच्या कडकडाटात नानिवडेकर यांच्या गझलांना प्रतिसाद मिळतो. महाराष्ट्रात विविध ठिकाणी गझल कार्यशाळेत नानिवडेकर मार्गदर्शन करायचे. गझलविश्वात प्रतिष्ठेचा मानला गेलेला युआरएल फाऊंडेशचा 2019 चा गझलगौरव पुरस्कार तसेच गझल लेखनातील कार्याबद्दल टिळक वाचन मन्दिरचा २०२० मधील व्दारकानाथ शेंडे साहित्य पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग मधील दिवंगत साहित्यिक यांचा परीचय करून देणाऱ्या ‘साहित्य सिंधू’ या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले होते.

मधुसूदन नानिवडेकर यांनी दैनिक पुढारी मध्ये काही काळ उपसंपादक म्हणून काम केले असून सध्या ते महाराष्ट्र टाईम्स चे सिंधुदुर्ग प्रतिनिधी म्हणून काम करीत होते. १९७७ साला पासून त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी लिहिलेली ‘ठेव तु मनातल्या मनात’ ही कविता सुरेश भटांच्या निदर्शनास आली आणि ते म्हणाले अरे ही तर गझल आहे, तेव्हापासून ते गझल कडे वळले. तेवढ्याच सशक्तपणे ते गझल लिहिली. नानिवडे गावचे सरपंच म्हणूनही त्यांनी काम केलं होत।

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका!

News Desk

Dhangar Reservation । सरकारने केवळ गाजर दाखवण्याचे काम केले !

News Desk

कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष, नवनिर्वाचित आमदारांना देणार शपथ

News Desk